न्यायालय : नवीन कैलाशनगरातील घटनानागपूर : अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन कैलाशनगर येथील एका भाडेकरूवरील खुनी हल्लाप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजयकुमार शुक्ला यांच्या न्यायालयाने आरोपी घरमालकाला पाच वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी एक हजार रुपये जखमीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. खुशाल नामदेव गाणार (३०) असे आरोपीचे नाव असून, तो नवीन कैलाशनगर येथील रहिवासी आहे. नरेश शालिकराम अलोणे, असे जखमी भाडेकरूचे नाव आहे. या प्रकरणाची हकीकत अशी की, नरेश अलोणे हा खुशाल गाणारच्या घरी आपली पत्नी, आई-वडील आणि भावासोबत भाड्याने राहत होता. २८ मे २०१३ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नरेश हा आपल्या कामावरून घरी आला होता. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास तो जेवण करीत असताना खुशाल गाणार हा एका ग्लासमध्ये मद्य घेऊन नरेशच्या घरी आला होता. त्याने नरेशच्या वडिलांना जबरदस्तीने दारू पाजण्याचा प्रयत्न करताच नरेशने त्याला मनाई करून घराबाहेर जाण्यास सांगितले होते. त्यामुळे राग येऊन खुशाल हा आपल्या घरी गेला. त्याने चाकू आणून नरेश अलोणे याच्यावर वार करून जखमी केले होते. हल्ला होताना नरेशची पत्नी दीपाली आणि वडील यांनी धावपळ करून बचावाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी अजनी पोलिसांनी भादंविच्या ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करून खुशाल गाणार याला अटक केली होती. पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात नऊ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपी खुशाल गाणार याला शिक्षा सुनावण्यात आली. (प्रतिनिधी)
भाडेकरूवर हल्ला करणाऱ्यास कारावास
By admin | Updated: April 8, 2016 03:11 IST
अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन कैलाशनगर येथील एका भाडेकरूवरील खुनी हल्लाप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजयकुमार शुक्ला यांच्या न्यायालयाने ...
भाडेकरूवर हल्ला करणाऱ्यास कारावास
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}