शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

शिक्षेपेक्षा तरुणांना गुन्हेगारीपासून दूर ठेवणे महत्त्वाचे : पोलीस आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:08 IST

तरुण पिढीमध्ये नैतिकता आणि सामाजिक दायित्वाची भावना कमी होत असून, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे त्यांची वाटचाल वाढत आहे. त्यामुळे ते ड्रग्स, मादक पदार्थांचे सेवन व तस्करी तसेच सायबर गुन्हेगारीकडे वळत आहेत. समाजासाठी हे धोक्याचे संकेत आहेत. मात्र वाममार्गाकडे वळणाऱ्या तरुणांना दंडात्मक कारवाई व शिक्षा देण्यापेक्षा त्यांना गुन्हेगारीपासून दूर ठेवणे अधिक महत्त्वाचे असून, तेच आमचे ध्येय असल्याची ग्वाही शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली.

ठळक मुद्दे‘छात्र पोलीस’ संकल्पनेशी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जोडणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तरुण पिढीमध्ये नैतिकता आणि सामाजिक दायित्वाची भावना कमी होत असून, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे त्यांची वाटचाल वाढत आहे. त्यामुळे ते ड्रग्स, मादक पदार्थांचे सेवन व तस्करी तसेच सायबर गुन्हेगारीकडे वळत आहेत. समाजासाठी हे धोक्याचे संकेत आहेत. मात्र वाममार्गाकडे वळणाऱ्या तरुणांना दंडात्मक कारवाई व शिक्षा देण्यापेक्षा त्यांना गुन्हेगारीपासून दूर ठेवणे अधिक महत्त्वाचे असून, तेच आमचे ध्येय असल्याची ग्वाही शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली.तरुण पिढीला गुन्हेगारीपासून परावृत्त करून सजग आणि सतर्क नागरिक बनविण्याच्या दृष्टीने शहर पोलीस विभागातर्फे महत्त्वाची ‘छात्र पोलीस’ संकल्पना राबविण्यात येत असून, या संकल्पनेचा शुभारंभ बुधवारी पोलीस आयुक्त ांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेश पांडे, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अपर आयुक्त बी.जी. गायकर, कॉलेजचे महासचिव गोविंद अग्रवाल, सचिव राजेंद्र पुरोहित, मैत्री परिवाराचे चंदू पेंडके तथा महामेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. उपाध्याय पुढे म्हणाले, तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करणे ही आमची जबाबदारी आहे. प्रबोधनात मोठी शक्ती असते व या माध्यमातून तरुणांना व विशेषत: विद्यार्थ्यांना गुन्हेगारीच्या दुष्परिणामाबाबत जागृत केले जाऊ शकते. गुन्हेगारीच्या गर्तेत अडकल्याने आपले करिअर नष्ट होईल आणि आपल्याला विदेशातही जाण्याची शक्यता बंद होईल, ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये झाल्यास ते गुन्हेगारीपासून स्वत:च दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.डॉ. उपाध्याय यांनी सांगितले, राज्यात दरवर्षी ११ हजार नागरिकांचा रस्ते अपघातात बळी जातो. यामध्ये १६ ते ३५ वर्षे वयोगटातील लोकांची संख्या ८० टक्के असून, हा आकडा भयावह आहे. बहुतेक अपघात हे मानवी चुकींमुळे होतात. विद्यार्थ्यांना जागृत करून यातील १० ते १५ टक्के मृत्यू टाळले जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना गुन्हेगारीपासून, नशेच्या सेवनापासून दूर करणे, वाहतूक नियम आणि दहशतवादाबाबत जागृत करण्यासाठी छात्र पोलीस अभियानाचा आरंभ करण्यात आला असून, ही संकल्पना संपूर्ण देशात राबविण्याची ग्वाही पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली. यापूर्वी मिशन मृत्युंजय अभियान राबविण्यात आले होते व यासोबत सव्वा लाख विद्यार्थ्यांना जोडण्यात आले होते.नंतर हे अभियान राज्यभरात लागू करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डीसीपी राहुल माणकीकर व संचालन निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी केले. डीसीपी संभाजी कदम यांनी आभार मानले.महाविद्यालयात दाखविणार सीडीया अभियानांतर्गत नित्यानंद तिवारी यांच्या दिग्दर्शनात वाहतूक, गुन्हेगारीचा विळखा, ड्रग्स अ‍ॅडिक्शन व दहशतवाद याबाबत जागृती करणारी फिल्म तयार करण्यात आली असून, यामध्ये स्वप्निल राऊत व इतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अभिनय केला आहे. कॉलेजच्या परिसरातच याचे चित्रीकरण करण्यात आले. ही सीडी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय व चित्रपटगृहात दाखविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीPoliceपोलिस