गडचिरोलीत मद्यधुंद बसचालकावर तात्काळ कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 15:17 IST2020-02-11T15:17:13+5:302020-02-11T15:17:40+5:30
मद्यप्राशन करून एस.टी. बस चालवणाऱ्या चालकावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना सोमवारी गडचिरोली येथे घडली.

गडचिरोलीत मद्यधुंद बसचालकावर तात्काळ कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: मद्यप्राशन करून एस.टी. बस चालवणाऱ्या चालकावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना सोमवारी गडचिरोली येथे घडली. प्रभाकर सावरकर (३७) असे या चालकाचे नाव असून त्याने गडचिरोली आगाराची बस क्र. एम.एच. १२-६९४२ सोमवारी पहाटे ६ च्या सुमारास विकासपल्लीला नेत असताना वाटेत मद्यप्राशन केले. त्यानंतर त्याने त्या धुंदीत बस आडवीतिडवी चालविली. ही बाब रेवडी येथील पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी बस पोलिस मदत केंद्रासमोर आणून थांबवली. या ठिकाणी वाहन चालक दारु प्यायल्याचे सिद्ध झाल्याने त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.