शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयातील सांडपाणी प्रक्रिया केंद्राला ‘आयएमए’चा विरोध

By सुमेध वाघमार | Updated: May 21, 2023 15:51 IST

‘आयएमए’ नागपूर शाखेचा पदग्रहण सोहळा रविवार आयोजित करण्यात आला होता

नागपूर : राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारण्याचा सूचना शासनाने केल्या आहेत. याला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा (आयएमए) विरोध आहे. स्थानिक प्रशासनाने त्या-त्या शहरात ‘कॉमन एसटीपी’ उभारावी अशी मागणी आहे, असे प्रतिपादन ‘आयएमए’ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र कुटे यांनी येथे केले.

‘आयएमए’ नागपूर शाखेचा पदग्रहण सोहळा रविवार आयोजित करण्यात आला होता, त्यापूर्वी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रीय ‘आयएमए’चे उपाध्यक्ष डॉ. जयेश लेले, राज्य ‘आयएमए’चे पुढील वर्षीचे अध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव, नागपूर ‘आयएमए’च्या अध्यक्ष डॉ. वंदना काटे, सचिव कमलाकर पवार व ‘आयएमए’ नागपूरचा पुढील वर्षीच्या अध्यक्ष डॉ. मंजुश्री गिरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. ठाकरे म्हणाले, रुग्णालयातील निघणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. परंतु तेवढीच गरज घराघरातून निघणाºया सांडपाण्यावर सुद्धा आहे. कारण घरातही रुग्ण राहतात. त्यांचे मल-मूत्र, रक्त हे मोठ्या प्रमाणात सांडपाण्यात मिसळते. यामुळे स्थानिक प्रशासाने ‘कॉमन एसटीपी’ प्रकल्प उभारावा. ज्यामुळे रुग्णालयाचा खर्च व जागाही वाचेल. डॉ. आढाव म्हणाले, ही मागणी आम्ही लावून धरली आहे. यासाठी अधिकाºयांना निवेदनही देण्यात आले आहे.

५० लाखांच्या मदतीसाठी आता न्यायालयीन लढाई

डॉ. जयेश लेले म्हणाले, कोरोना रुग्णांवर उपचार करताना संसर्ग होऊन जीव गमावणाºया डॉक्टरांना ५० लाख रुपयांचे कोरोना कवच विमा संरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली होती. कोरोनाचा काळात देशभरातील खासगी क्षेत्रातील २ हजार डॉक्टरांनी आपले जीव गमावले. परंतु अद्याप एकाही डॉक्टरांना ५० लाखांची मदत मिळाली नाही. यात ६५ वर्षांवरील व तरुण डॉक्टरांची संख्या मोठी आहे. यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत. 

‘सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट’ हवा

डॉक्टरांवरील मारहाणीचा घटना वाढत चालल्या आहेत. दोषींवर कठोर कारवाई होत नसल्याने डॉक्टरांना जीवे मारले जात आहे. केरळमधील घटना हे याचे ताजे उदाहरण आहे. या घटना रोखण्यासाठी ‘सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट’ची ‘आयएमए’ची मागणी आहे, असे डॉ. लेले यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरhospitalहॉस्पिटल