आयएमए नागपूरला सर्वाेत्कृष्ट पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:19 AM2018-12-01T01:19:11+5:302018-12-01T01:20:38+5:30

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्य परिषदेत २०१७-१८ या वर्षासाठी नागपूर ‘आयएमए’ शाखेला सर्वाेत्कृष्ट शाखेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी अध्यक्षपद भूषविलेल्या डॉ. वैशाली खंडाईत व सचिव डॉ. प्रशांत राठी यांच्यासह सदस्यांना गौरविण्यात आले.

IMA Nagpur best award | आयएमए नागपूरला सर्वाेत्कृष्ट पुरस्कार 

आयएमए नागपूरला सर्वाेत्कृष्ट पुरस्कार 

Next
ठळक मुद्देआयएमए राज्य परिषद : वैशाली खंडाईत उत्कृष्ट अध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्य परिषदेत २०१७-१८ या वर्षासाठी नागपूर ‘आयएमए’ शाखेला सर्वाेत्कृष्ट शाखेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी अध्यक्षपद भूषविलेल्या डॉ. वैशाली खंडाईत व सचिव डॉ. प्रशांत राठी यांच्यासह सदस्यांना गौरविण्यात आले.
मुंबई येथे २३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान ‘आयएमए’ राज्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत गेल्या वर्षी स्थानिक पातळीवर राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या नागपूर शाखेला उत्कृष्ट शाखा म्हणून सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, नागपूर आयएमएला विविध संवर्गात अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात उत्कृष्ट अध्यक्ष म्हणून डॉ. वैशाली खंडाईत तर सचिव म्हणून प्रशांत राठी यांना सन्मानित करण्यात आले. डॉ. खंडाईत यांना ‘आयएमए’च्या राज्यातील सर्वात मोठ्या शाखेचा अध्यक्षाचा पुरस्कारही बहाल करण्यात आला. याशिवाय, नागपूर शाखेतील डॉ. संजय देशपांडे, डॉ. प्रकाश देव, डॉ. आनंद काटे, डॉ. अनिल लद्धड, डॉ. प्रशांत राठी, डॉ. आशिष दिसावल, डॉ. कुश झुनझुनवाला, डॉ. दिनेश अग्रवाल, डॉ. वंदना काटे, डॉ. अल्का मुखर्जी, डॉ. अनुराधा रिधोरकर, डॉ. विंक रुघवाणी, डॉ. विरल शाह, डॉ. सचिन देवकर यांनाही विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
डॉ. निखाडे यांना विशेष पुरस्कार
राज्य परिषदेत ‘आयएमए’ नागपूरचे माजी अध्यक्ष डॉ. डी. एन. अग्रवाल यांना जीवन गौरव तर प्रशांत निखाडे यांना सामजिक सुरक्षा योजनेत विशेष योगदान दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. डॉ. वाय. एस. देशपांडे यांनाही त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळासाठी गौरविण्यात आले. आयएमएच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल व सचिव डॉ. दिनेश अग्रवाल यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे अभिनंदन केले.

Web Title: IMA Nagpur best award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.