नागपूर मनपा परिवहन सभापतीच्या नावावर वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:29 IST2018-03-19T23:28:59+5:302018-03-19T23:29:10+5:30
महापालिकेच्या परिवहन विभागाने शहर व्यवस्थापनाची जबाबदारी घेतल्यापासून दररोज नवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत. असाच प्रकार सोमवारी निदर्शनास आला. परिवहन सभापती बंटी कुकडे यांच्या नावावर वसुली करणाऱ्या एका संशयिताला नागरिकांनी पकडले. त्याला महापालिका मुख्यालयात आणून सभापतीसमोर उभे करण्यात आले. परंतु संशयित व्यक्ती बंटी कुकडे यांना ओळखू शकली नाही. या प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेता, त्यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले.

नागपूर मनपा परिवहन सभापतीच्या नावावर वसुली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागाने शहर व्यवस्थापनाची जबाबदारी घेतल्यापासून दररोज नवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत. असाच प्रकार सोमवारी निदर्शनास आला. परिवहन सभापती बंटी कुकडे यांच्या नावावर वसुली करणाऱ्या एका संशयिताला नागरिकांनी पकडले. त्याला महापालिका मुख्यालयात आणून सभापतीसमोर उभे करण्यात आले. परंतु संशयित व्यक्ती बंटी कुकडे यांना ओळखू शकली नाही. या प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेता, त्यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले.
सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास महापालिका मुख्यालयातील परिवहन समितीच्या कक्षात बंटी कुकडे विविध विषयांवर चर्चा करीत असताना काही नागरिकांनी एका व्यक्तीला कुकडे यांच्या कक्षात आणले. कुकडे यांच्यापुढे उभे करून तुम्ही सभापतींना ओळखता का, असा सावल केला. परंतु यावर ती व्यक्ती काहीही बोलत नाही. बोलत नसल्याने नागरिकांनी त्याला चांगलेच फटकारले. हा काय प्रकार आहे. याची माहिती घेण्यासाठी कुकडे पुढे आले असता, संशयित व्यक्ती त्यांच्या नावावर तिकीट चेकर असल्याचे सांगून वसुली करीत असल्याचे निदर्शनास आणले. याचा व्हिडिओ तयार केल्याची माहिती मिळाली. कुकडे यांनी संबंधित व्यक्तीला विचारणा केली असता, त्याचे नाव सुभाष ढोके असल्याचे सांगितले.
मेडिकल महाविद्यालयाच्या मागील बाजूच्या वंजारीनगर परिसरात राहत असल्याची माहिती त्याने दिली. पैसे नसल्याने बसमध्ये चढलो व तुमचे नाव सांगितले. वसुली केली नाही. त्याने खिशातील पाकिटही दाखविले. त्यात काही सुटे पैसे असल्याचे आढळून आले. अजनी येथून एका बसमध्ये ढोके यांना पकडले होते. त्याला आणणाºयापैकी एक जण परिवहन विभागाचा माजी कर्मचारी होता. ढोके याच्या नावावर ही व्यक्ती नेहमी वसुली करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेता, कु कडे यांनी परिवहन विभागातील कर्मचाºयांना संशयिताला पोलिसांच्या ताब्यात देऊन तक्रार करण्याची सूचना केली.
प्रकरणाची चौकशी करणार
प्रकरण संशयास्पद आहे. एखादी व्यक्ती माझ्या नावावर वसुली करीत असेल तर योग्य नाही. या प्रकरणाची चौकशी करू. यामुळेच पोलिसात तक्रार करण्याची सूचना केली आहे. पोलीस तपासात या प्रकरणातील सत्य बाहेर येईल.
बंटी कुकडे, सभापती परिवहन समिती