हुडकेश्वरसह ठिकठिकाणचे अवैध बांधकाम पाडले: अतिक्रमण विरोधी पथकाची कामगिरी
By नरेश डोंगरे | Updated: April 27, 2023 22:07 IST2023-04-27T22:06:54+5:302023-04-27T22:07:04+5:30
गादी भंडार, बिर्याणी वाल्यावरही कारवाई

हुडकेश्वरसह ठिकठिकाणचे अवैध बांधकाम पाडले: अतिक्रमण विरोधी पथकाची कामगिरी
नागपूर: महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी वेगवेगळ्या पथकांनी हनुमाननगर झोनमधील हुडकेश्वर तसेच मंगळवारी झोनमधील मानकापूर परिसरात तसेच नेहरूनगर झोनमध्ये अवैध बांधकाम आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली.
हुडकेश्वरमधील साैभाग्य नगरात असलेल्या हिंदुस्थान गादी भंडारसह आणखी काही ठिकाणच्या संचालकाने केलेल्या अवैध बांधकामाला तोडले. महापालिकेच्या झोन कार्यालयाने संबंधित व्यक्तींना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियम कलमा अंतर्गत २० मार्च २०२३ ला नोटीस बजावण्यात आली होती. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने साैभाग्यनगरातील अवैध बांधकाम तोडण्यात आले.
त्याचप्रमाणे दुसऱ्या पथकाने मंगळवारी बाजार परिसरातील मुल्ला बिर्याणीवाल्यांचे अतिक्रमण हटवून दोन काउंटर जप्त करण्यात आले. यानंतर मानकापूर ते पागलखाना चाैकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले ठेले आणि दुकानाचे अतिक्रमण हटविण्यात आले. अतिक्रमण करणाऱ्या एकूण ३६ जणांविरुद्ध कारवाई कून एक ट्रक सामान जप्त करण्यात आले. तिसऱ्या पथकाने नेहरूनगर झोन अंतर्गत येणाऱ्या वाठोडा बाजार मार्गावरचे अतिक्रमण हटविले. ही कारवाई उपायुक्त अशोक पाटील, अधीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात भास्कर मालवे, विनोद कोकर्डे आणि पथकाने केली.