नागपूरमधील कॅन्सर इन्स्टिट्यूटचं सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते लोकार्पण, गौतम अदानींची उपस्थिती
By योगेश पांडे | Updated: April 27, 2023 11:02 IST2023-04-27T11:00:04+5:302023-04-27T11:02:04+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित

नागपूरमधील कॅन्सर इन्स्टिट्यूटचं सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते लोकार्पण, गौतम अदानींची उपस्थिती
नागपूर : जामठा येथे कॅन्सरग्रस्तांसाठी उभारलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री येणार होते मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला. तर, उद्योगपती गौतम अदानी यांची विशेष उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संघाचे अखिल भारतीय प्रसार प्रमुख सुनील देशपांडे हेदेखील उपस्थित आहेत. यावेळी अदानी व सरसंघचालकांनी इस्पितळाची सखोल पाहणी केली.
या इन्स्टिट्यूटमध्ये सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार होणार असून रुग्णांना माफक दरात उपचाराची सोय होणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून कर्करोगाच्या रुग्णांना नवसंजीवनी मिळण्यास मदत होणार आहे.