शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील पर्यटन वाढीसाठी आयआयएम नागपूरचे सहकार्य; राज्य सरकारचा प्रस्ताव

By आनंद डेकाटे | Updated: February 7, 2026 20:33 IST

Nagpur : नैसर्गिक वनसंपदेने परिपूर्ण विदर्भातील पर्यटनवाढीसाठी आयआयएम नागपूर सहकार्य करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नैसर्गिक वनसंपदेने परिपूर्ण विदर्भातील पर्यटनवाढीसाठी आयआयएम नागपूर सहकार्य करणार आहे. प्रशिक्षण, क्षमतावाढ आणि स्थानिक वस्तूंना प्रोत्साहन देणे यादृष्टीने सरकारला मदत करणार असल्याची माहिती आयआयएम नागपूरचे संचालक डाॅ. भीमराया मेत्री यांनी पत्रकारांना दिली.

आयआयएम नागपूरमध्ये शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत बोलताना डाॅ. मेत्री यांनी सांगितले की, सरकार पर्यटनवाढीवर भर देत आहे. आपल्याकडे ताडोबा, पेंंच सारखे मोठे पर्यटन स्थळ आहेत. यासोबतच इतर पर्यटनस्थळ सुद्धा विकसित केली जात आहेत. येथील पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा, अधिकाधिक पर्यटकांचा ओढा विदर्भाकडे यावा, यासाठी पर्यटन क्षेत्रातील कौशल्य विकास, डेस्टिनेशन मॅनेजमेंट आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्य सरकारने आयआयएम नागपूरला प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव आम्ही स्वीकारला आहे. आयआयएम आपल्या तज्ज्ञांच्या मदतीने प्रशिक्षण, इकोसिस्टम डेव्हलप करणे आणि स्थानिक स्थरावरील वस्तूंना कसे प्रमोट करता येईल, यावर कार्य करतील.

ग्रामीण भागात छोटे उद्योजक वाढवण्यावर भर

आयआयएम नागपूरतर्फे विदर्भातील ग्रामीण भागात छोटे उद्योजक तयार करण्यावर अधिक भर दिला जात असून, अशा उद्योजकांना सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी अकराही जिल्ह्यांमध्ये छोटे सेंटर तयार केले जाणार असल्याचे डाॅ. मेत्री यांनी सांगितले. काही जण केवळ शासनाचे अनुदान मिळवण्यासाठी उद्योग लावतात, पण ग्रामीण भागातील छोटे उद्योजक हे आपल्या कामाप्रती प्रामाणिक व गंभीर असतात. त्यामुळे सरकारचा पैसाही वाचतो आणि ग्रामीण भागातील विकासालाही बळ मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक कुंभमेळ्यातील गर्दीचे व्यवस्थापन करणार

नाशिक कुंभमेळ्यात गर्दीचे व्यवस्थापन व्हावे, यासाठी आयआयएम नागपूर राज्य सरकारला व स्थानिक प्रशासनाला मदत करणार आहे. यासंदर्भात येत्या १५ तारखेला बैठक होत आहे, त्यात नेमके काय करायचे आहे, हे स्पष्ट होणार असल्याचेही डाॅ. मेत्री यांनी सांगितले.

गोवा येथे उपकेंद्र होणार

गोवा येथे आयआयएम नागपूरचे उपकेंद्र लवकरच सुरू होणार आहे. यासाठी जागाही मिळाली असल्याची माहिती मेत्री यांनी दिली. भविष्यात हैदराबाद येथे उपकेंद्र सुरू करण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागपूरच्या कॅम्पसमधील जागा आता कमी पडू लागली असल्याने नवीन हाॅस्टेल, सभागृह व इतर इमारती बांधण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : IIM Nagpur to boost Vidarbha tourism in collaboration with government.

Web Summary : IIM Nagpur will collaborate with the Maharashtra government to boost Vidarbha tourism through training, capacity building, and promoting local products. Focus on rural entrepreneurship and managing crowds at Nashik Kumbh Mela. A sub-center will soon open in Goa.
टॅग्स :nagpurनागपूरEducationशिक्षणVidarbhaविदर्भ