शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आयआयएम नागपूरचे केस रिसर्च सेंटर ठरेल देशासाठी ‘स्टोरी इंजिन’

By आनंद डेकाटे | Updated: November 17, 2025 20:25 IST

कॅनडाच्या तज्ज्ञ व्हायोलेट्टा गॅलाघर : स्वतःचे केस रिसर्च केंद्र स्थापन करणारे नागपूर देशातील सर्वांत तरुण आयआयएम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आय. आय. एम नागपूरने सुरू केलेले केस रिसर्च सेंटर हे भारतीय व्यवसायांचे अनुभव, त्यांचे संघर्ष आणि यशोगाथा यांना जागतिक स्तरावर पोचवणारे एक ‘स्टोरी इंजिन’ म्हणून कार्य करेल. यातूनच भारताच्या बिझनेस स्टोरीजचा अभ्यास जगभर केला जाईल,’ असे प्रतिपादन आयव्ही पब्लिशिंग या कॅनडामधील संस्थेच्या संचालिका व्हायोलेट्टा गॅलाघर यांनी केले.

आयव्ही ही व्यवस्थापन क्षेत्रात अभ्यासाकरिता केस स्टडी तयार करणारी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी संस्था आहे. या संस्थेच्या सहकार्यानेच भारतीय प्रबंध संस्थान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूरने सोमवारी आपल्या केस रिसर्च सेंटर(सीआरसी)ची सुरुवात केली. भारतीय उद्योग, स्टार्टअप, सरकारी उपक्रम आणि सामाजिक संस्थांच्या वास्तव उदाहरणांवर आधारित केस स्टडी तयार करण्यासाठी हे केंद्र काम करणार आहे. यामुळे व्यवस्थापन शिक्षण अधिक भारतीय, अधिक व्यवहार्य आणि प्रत्यक्ष समस्यांशी जोडले जाणार आहे.

केंद्राच्या औपचारिक उद्घाटनानंतर आता आय. आय. एम. नागपूर हे असे स्वतंत्र केंद्र असलेले देशातील चौथे केवळ दहा वर्षांत असे केंद्र सुरू करणारे एकमेव असे संस्थान ठरले आहे. कार्यक्रमाला आय. आय. एम. नागपूरचे संचालक प्रा. भीमराया मेत्री, आयव्ही पब्लिकेशनचे असोसिएट डायरेक्टर अलेजांद्रो गार्सिया, केस रिसर्च सेंटरचे प्रमुख प्रा. राकेश गुप्ता, व्यासपीठावर उपस्थित होते.

केस रिसर्च सेंटरचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे लाभ केवळ आय. आय. एम. नागपूरपुरते मर्यादित राहणार नाहीत. सुरुवातीला देशातील व्यवसाय शिक्षण देणाऱ्या नऊ प्रमुख संस्था या केंद्रासह ‘मेंबर बिझनेस स्कूल’ म्हणून जोडल्या गेल्या आहेत. या संस्थांना केंद्राच्या माध्यमातून आपल्या केस स्टडी तयार करण्याचे मार्गदर्शन आणि जागतिक स्तरावरील केस स्टडीजचा अभ्यास करण्याची संधी प्राप्त होणार आहे. या नऊ संस्थांचे प्रतिनिधीही उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. यात अमृतवहिनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, संगमनेर,डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर स्टडीज, नाशिक; फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंट, नवी दिल्ली, आय. आय. एल. एम. लोधी रोड; आय. एम. आय. कोलकाता, आय. एम. एस. गाझियाबाद, लालबहादूर शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, दिल्ली, पी. एम. एल. एस. डी बिझनेस स्कूल, चंदीगड, आणि संजीवनी विद्यापीठ, अहिल्यानगर यांचा समावेश होता.प्रो. राकेश गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. प्रो. यतीश जोशी यांनी आभार मानले. 

English
हिंदी सारांश
Web Title : IIM Nagpur's Case Research Center: A 'Story Engine' for India

Web Summary : IIM Nagpur launches a Case Research Center (CRC), aiming to globally showcase Indian business experiences. Partnering with IVY Publishing, the center will create India-centric case studies, benefiting management education and nine other institutions, making learning practical and relevant.
टॅग्स :nagpurनागपूर