शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तुमची 'शुगर' वाढली असेल तर 'लिव्हर फेल'चा धोका ! जागतिक संशोधनाने नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 19:42 IST

Nagpur : मधुमेह म्हटले की, आपल्याला फक्त रक्तातील साखर किंवा हृदयाच्या आजारांची भीती वाटते. मात्र, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका जागतिक संशोधनाने नवा खुलासा केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मधुमेह म्हटले की, आपल्याला फक्त रक्तातील साखर किंवा हृदयाच्या आजारांची भीती वाटते. मात्र, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका जागतिक संशोधनाने नवा खुलासा केला आहे. टाइप-२ मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये यकृत निकामी होण्याचा धोका मोठा असतो. भारतात झालेल्या सर्वात मोठ्या 'दी डाय-फिब-लिव्हर स्टडी' अभ्यासातून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. विशेष म्हणजे, या राष्ट्रीय सर्वेक्षणात नागपूर शहरातून मिळालेल्या माहितीचा मोठा वाटा असून, हे संशोधन वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य 'द लॅन्सेट' जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

प्रख्यात मुधमेह तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता आणि त्यांच्या टीमने या संशोधनासाठी दिलेल्या योगदानामुळे स्थानिक स्तरावरील मधुमेहींची नेमकी स्थिती जागतिक पटलावर आली आहे. जानेवारी ते जुलै २०२४ दरम्यान भारतातील विविध केंद्रांवर हा अभ्यास करण्यात आला. यामध्ये ९,२०२ प्रौढ मधुमेही रुग्णांची 'व्हायब्रेशन कंट्रोल ट्रान्झिएंट इलास्टोग्राफी' (व्हीसीटीई) द्वारे तपासणी करण्यात आली. यकृताच्या कडकपणाची पातळी मोजून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मधुमेह असलेल्या दर ४ पैकी १ व्यक्तीमध्ये (२६ टक्के) यकृताचा गंभीर आजार आढळला. दर ७ पैकी एका रुग्णामध्ये (१४ टक्के) आजार प्रगत अवस्थेत पोहोचला होता. दर २० पैकी १ रुग्ण (५ टक्के) असा आहे, ज्याचे यकृत निकामी होण्याच्या उंबरठ्यावर होते, परंतु अद्याप निदान झाले नव्हते. लठ्ठ व्यक्तीच नाही, तर 'बीएमआय' २५ पेक्षा कमी आहे अशा १९ टक्के 'नॉन-ओबेस' व्यक्तींत यकृताचा आजार दिसून आला. 

यकृतावर चरबी नसली तरीही धोका!

या अभ्यासातील सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे 'स्टीटोसिस' किंवा यकृतावरील चरबी. साधारणपणे यकृतावर चरबी असेल तरच थोका मानला जातो, मात्र या अभ्यासात असे दिसून आले की, ज्यांच्या यकृतावर चरबी नव्हती अशा १३ टक्के रुग्णांना आधीच गंभीर 'फायब्रोसिस' होता. यामुळे सध्याच्या केवळ 'फॅटी लिव्हर' तपासण्याच्या पद्धतीला मोठे आव्हान मिळाले आहे.

दक्षिण भारतात ३० टक्के प्रमाण

संशोधनानुसार, दक्षिण भारतात हा धोका सर्वाधिक ३० टक्के तर मध्य भारतात २१ टक्के आढळला. यकृत खराब होण्यामागे प्रामुख्याने लठ्ठपणा, रक्तातील कोलेस्ट्रॉलचे असंतुलन, किडनीचे जुने आजार आणि १० वर्षांहून अधिक काळ असलेला मधुमेह ही मुख्य कारणे आहेत.

"मधुमेहाच्या नियमित उपचारांमध्ये यकृताच्या तपासणीचा तातडीने समावेश करावा. केवळ वजन पाहून रुग्णाची तपासणी न थांबवता, सर्व मधुमेही रुग्णांची यकृत चाचणी होणे काळाची गरज आहे. वाढता आजार लक्षात घेता आरोग्य धोरणांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे."- डॉ. सुनील गुप्ता, प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ

English
हिंदी सारांश
Web Title : High Blood Sugar Linked to Liver Failure: Global Study Reveals

Web Summary : Type-2 diabetes increases liver failure risk, a major Indian study reveals. One in four diabetics face serious liver issues, even without obesity. Liver checks should be standard for diabetes management.
टॅग्स :Healthआरोग्यdiabetesमधुमेहnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र