बनावट उत्पन्नाचा दाखला द्याल तर सीएम फंडातून मदत नाही

By आनंद डेकाटे | Updated: June 30, 2025 19:53 IST2025-06-30T19:50:07+5:302025-06-30T19:53:02+5:30

Nagpur : उत्पन्नाचे प्रमाणपत्र आपले सरकार सेवा केंद्रामधून अधिकृतरीत्या तयार असावे

If you submit a fake income certificate, there will be no help from CM fund. | बनावट उत्पन्नाचा दाखला द्याल तर सीएम फंडातून मदत नाही

If you submit a fake income certificate, there will be no help from CM fund.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, हैदराबाद हाऊस येथील कक्षामार्फत गरजू व पात्र रुग्णांना वैद्यकीय उपचाराकरिता अर्थसहाय्य अदा करण्याची महत्त्वपूर्ण कामे केली जातात. यात रुग्णाच्या अर्जासोबत जोडण्यात येत असलेले उत्पनाचे प्रमाणपत्र जर बनावट आढळून आल्यास अशा रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

उत्पन्नाचे प्रमाणपत्र आपले सरकार सेवा केंद्रामधून अधिकृतरीत्या तयार करण्यात आले पाहिजे. कोणत्याही दलालामार्फत अथवा एजंटमार्फत प्रमाणपत्र तयार करू नये. बनावट प्रमाणपत्र सादर केल्यास संबंधित अर्जदारावर व तसेच बनावट प्रमाणपत्रे तयार करणाऱ्यांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कार्यालयाने दिला आहे.

Web Title: If you submit a fake income certificate, there will be no help from CM fund.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर