शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

लक्ष्मीपूजनापर्यंत कचरा उचलला नाही तर महापालिकेत आणू, शहर काँग्रेसचा मनपा आयुक्तांना इशारा

By कमलेश वानखेडे | Updated: November 9, 2023 15:45 IST

निदर्शने करीत दीड तास घेराव

नागपूर : शहरातील कचरा गोळा करणारी कंपनी घरोघरी जावून कचरा संकलन करण्यास टाळाटाळ करीत आहे. परिणामी शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. फ्लॅट स्कीममधील कचरा उचलण्यासाठी नागरिकांना पैशाची मागणी केली जात आहे. हे प्रकार थांबले नाही व रविवारी लक्ष्मीपूजनापर्यंत शहरातील कचरा उचलल्या गेला नाही तर काँग्रेसचे कार्यकर्ते शहरातील कचरा गाड्यांमध्ये जमा करतील व महापालिकेच्या कार्यालसमोर आणून टाकतील, असा इशारा काँग्रेसतर्फे महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आला.

काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी महापालिका आयुक्त डॉ. चौधरी यांच्या कक्षासमोर निदर्शने केली. कार्यकर्त्यांची गर्दी पाहून पोलिसांनी आयुक्तांच्या कक्षाचे दार बंद केले. पण त्यानंतरही सुमारे शंभरावर कार्यकर्ते आयुक्तांच्या कक्षात शिरले व तब्बल दीड तास घोषणाबाजी करीत आयुक्तांना घेराव घातला. यावेळी सोशल मिडिया सेलचे प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, गुड्डु तिवारी, मनोज सांगोळे, विवेक निकोसे, सुजाता कोंबाडे, लोणारे, राजेश कुंभलकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आ. विकास ठाकरे यांनी आयुक्त डॉ. चौधरी यांना सांगितले की, कचरा संकलन करणाऱ्या कंपनीकडून घरोघरचा कचरा उचलला जात नाही. शहरात काही ठिकाणी कचऱ्याचे डम्पिंग बनविले आहे. शहरात कचरा साठवून प्रदुषण करीत आहे. फ्लॅट स्कीम मधील कचरा उलण्यासाठी पैसे मागितले जातात. दिवाळीच्या तोंडावर हा कचरा उचलला गेला नाही तर कार्यकर्ते वस्तीतील कचरा गोळा करतील व महापालिकेत आणून जमा करतील, असा इशारा त्यांनी दिला. यावर आयुक्तांनी याची तत्काळ दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले.

खोदलेल्या नाल्या बुजवा

- आ. ठाकरे म्हणाले, अमृत योजनेंतर्गत शहरात पाईपलाईन टाकण्यासाठी नाल्या खोदण्यात आल्या. त्या बुजविल्या नाहीत. त्यामुळे धुळ उडत आहे. मैदानात पाईप साठवून ठेवले आहेत. अधिकाऱ्यांनी याकडे डोळे बंद केले आहेत. याबाबीकडे आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.

प्रशासक राज सुरू, नागरिकांची लूट थांबवा

- आ. विकास ठाकरे म्हणाले, महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे. झोन स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांवरर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. एनडीएसचे पथक दुकानदारांना धमकावून पैसे उकळत आहेत. ओसीडब्ल्यु अव्वाच्या सव्वा बील वसुल करीत आहे. नागरिकांनी उघडपणे सुरू असलेली लूट थांबविण्याची मागणी त्यांनी केली. महिनाभरात हे चित्र बदलले नाही तर महापालिकेच्या पायऱ्यांवर उपोषणाला बसू, असा इशाराही त्यांनी दिला. यावर आयुक्त डॉ. चौधरी यांनी आपण स्वत: या बाबींकडे लक्ष देऊन महिनाभरात ही परिस्थीती सुधारू, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नcongressकाँग्रेसagitationआंदोलनnagpurनागपूर