रेशनचे धान्य विकले तर रद्द होणार कार्ड : शहर पुरवठा विभाग करेल कारवाई

By आनंद डेकाटे | Updated: June 18, 2025 19:22 IST2025-06-18T19:21:02+5:302025-06-18T19:22:02+5:30

पुरवठा विभाग गंभीर : साठेबाजांवर करडी नजर, धाडसत्र सुरू

If ration grains are sold, the card will be cancelled: City Supply Department will take action | रेशनचे धान्य विकले तर रद्द होणार कार्ड : शहर पुरवठा विभाग करेल कारवाई

If ration grains are sold, the card will be cancelled: City Supply Department will take action

आनंद डेकाटे, नागपूर 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
रेशनचे धान्य लोकांकडून विकत घेऊन ते खुल्या बाजारात विकणारे धान्य तस्कर मागील काही दिवसांपासून अधिक सक्रीय झाले आहे. शहर पुरवठा विभागाने सुद्धा त्यांच्यावर कारवाईसाठी कंबर कसली असून धाडी टाकणे सुरू केले आहे. आतापर्यंत दोन ठिकाणी धाडी टाकून असे धान्य जप्त करण्यात आले आहे. पुरवठा विभागाने नागरिकांनाही खुल्या बाजारात धान्य न विकण्याचे आवाहन केले आहे. कुणी जाणीवपूर्वक रेशनचे धान्य बाहेर विकत असल्याचे आढळून आल्यास त्याचे कार्ड रद्द करण्याबाबत पुरवठा विभाग गांभीर्याने विचार करीत आहे.

पावसाळ्यात रेशनचे धान्य घेताना गरीब व गरजू लोकांना अधिक त्रास होऊ नये. म्हणून राज्य सरकारने तीन महिन्याचे रेशन एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेशन वाटपास सुरूवात झाली आहे. तीन महिन्यांचे रेशन एकाच वेळी मिळत असल्याने साठेबाजी करणारे धान्य तस्करही सक्रीय झाले आहेत. काहींनी तर रेशन दुकानांवरच ठाण मांडले आहे. अधिकचे धान्य असल्याने गरीबही थोड्या पैशासाठी ते धान्य देण्यास तयार होतात. याचाच फायदा घेऊन ते ग्राहकांकडून धान्य विकत घेतात आणि खुल्या बाजारात विकताहेत. वस्त्यावस्त्यांमध्ये फिरून रेशनचे धान्य विकत घेतले जात आहे.

हा प्रकार उघडकीस येताच शहर पुरवठा विभागानेही कारवाई सुरू केली. बंगाली पंजा आणि ताजनगर परिसरात धाड टाकण्यात आली. तेथून शेकडो पोते धान्य जप्त करण्यात आले. यासोबतच रेशनचे धान्य घेऊन ते जाणीवपूर्वक विकणाऱ्यांवरही विभागाची करडी नजर आहे.
 

रेशनचे धान्य पोस्टीक, १२ प्रकारचे व्हिटॅमिन युक्त
रेशन दुकानातील तांदूळ हे पोस्टीक आहे. त्यात आयरन, फोलीक ॲसीड, व्हीटॅमिन बी-१२,व्हिटॅमिन -ए, व्हीटॅमिन बी-१, बी-३ यासाह एकूण १२ प्रकारचे व्हिटॅमिन आहेत. त्यामुळे हे पास्टीक धान्य स्वत: वापरा ते विकू नका, असे आवाहन शहर पुरवठा विभागाने केले आहे.

तस्करी करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार
रेशन धान्याची तस्करी करणारे आणि खासगी साठेबाजी करणाऱ्यांवर पुरवठा विभागाची करड नजर आहे. कारवाई सुरूच राहणार. नागरिकांनी सुद्ध रेशनचे धान्य खुल्या बाजारात विकू नये. जाणीवपूर्व धान्य विकताना कुणी आढळून आल्यास कार्ड रद्द केले जाईल.
विनोद काळे, शहर पुरवठा अधिकारी
 

Web Title: If ration grains are sold, the card will be cancelled: City Supply Department will take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर