शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

खोदकामात वीज वाहिनी तुटल्यास गुन्हा दाखल करू : ऊर्जामंत्री बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 9:41 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकास कामांसाठी खोदकाम करताना संबंधित संस्थेने वीज कंपनीला माहिती देणे आवश्यक आहे. असे न केल्यास खोदकामात भूमिगत वीज वाहिनी तुटल्यास किंवा क्षतिग्रस्त झाल्यास मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत संबंधित संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत विविध विकास कामे करणाऱ्या संस्थांना ...

ठळक मुद्देविकास कामे करणाऱ्या संस्थांना इशारालोकमत इम्पॅक्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकास कामांसाठी खोदकाम करताना संबंधित संस्थेने वीज कंपनीला माहिती देणे आवश्यक आहे. असे न केल्यास खोदकामात भूमिगत वीज वाहिनी तुटल्यास किंवा क्षतिग्रस्त झाल्यास मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत संबंधित संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत विविध विकास कामे करणाऱ्या संस्थांना दिला.नागपूर शहरात सध्या विकास कामे जोरात सुरु आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व मेट्रोच्या कामामुळे ठिकठिकाणी खोदकाम सुरु असते. परंतु हे खोदकाम होत असताना महावितरणच्या भूमिगत वीज वाहिन्या तुटण्याचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. या विषयावर महावितरण व मेट्रोमध्ये अनेकदा वादही होत असतात. यासंबंधात पत्रकारांनी ऊर्जामंत्र्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, विविध विकास कामांसाठी रस्त्यांवर खोदकाम केले जाते. खोदकाम करीत असताना संबंधित संस्थेने महावितरणला माहिती देणे आवश्यक आहे. परंतु याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. मेट्रोला यासंबंधात दोन वेळा निर्देश सुद्धा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासबंधात नव्याने निर्देश देण्यात येतील. यापुढे खोदकाम करताना भूमिगत वीज वाहिनीचे नुकसान झाल्यास संबंधितांविरुद्ध थेट गुन्हेच दाखल केले जातील, असे ते म्हणाले.यासोबतच वीज आहे परंतु फिडर बंद आहे, असे प्रकारही सुरू आहेत. याचा फटका सामान्य वीज ग्राहकांना सोसावा लागतो. तेव्हा वीज असूनही फिडर बंद असेल तर संबंधित शाखा अभियंत्यांना जबाबदार धरले जाईल असेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितले.१७८ ठिकाणी ६.८७ कोटीचे केबल क्षतिग्रस्तलोकमतने २९ आॅगस्ट रोजीच्या अंकात विकास कामांमुळे होत असलेल्या वीज नुकसानाचा मुद्दा उपस्थित केला होता. यात मार्च २०१७ पासून आतापर्यंत १७८ ठिकाणी ६.८७ कोटी रुपयाच्या वीज केबलचे नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. यामध्ये वीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनीने नुकसान भरपाईची मागणी केली असून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.वीज चोरणाऱ्या गणेश मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल होणारशहरात ११५१ गणेश मंडळांपैकी केवळ १०१ मंडळांनीच अधिकृत वीज कनेक्शन घेतल्याबाबत ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, सार्वजनिक पेंडॉलसाठी लागणारी वीज चोरी केली जाते. यावर उपाय म्हणून महावितरणने मंडळांसाठी अत्यल्प दरात वीज जोडणी देण्याची योजना सुरू केली आहे. इतके करूनही मंडळांकडून वीज चोरी केली जात असेल, तर महावितरण कारवाईसाठी सज्ज आहे. यासाठी भरारी पथक स्थापन केले असून ते कारवाई करतील. वीज चोरी पकडल्या गेल्यास गुन्हे दाखल होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.आजही तुटले केबल, २० हजार ग्राहक अंधारातविकास कामांच्या खोदकामात वीज केबल तुटण्याचा प्रकार शुक्रवारीही सुरूहोता. मेट्रोतर्फे बिनाकी परिसरात करण्यात आलेल्या खोदकामात उप्पलवाडी सब स्टेशन येथून निघालेले ३३ केवी बिनाकी फिडरचे केबल तुटले. यामुळे जवळपास २० हजार ग्राहकांची वीज सहा तास गायब होती. केबल तुटल्यामुळे तांडापेठ, मुदलीयार ले-आऊट, लालगंज, दही बाजार, मंगळवारी येथील वीज ग्राहकांना फटका बसला. विशेष म्हणजे नागपूर मेट्रोने आतापर्यंत केबल तोडून वीज वितरण फेन्चाईजी एसएनडीएलचे ९० लाख रुपयचे नुकसान केले आहे. मेट्रोने अजूनपर्यंत भरपाई दिलेली नाही.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेmahavitaranमहावितरण