शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; शहर स्वच्छ तर आपले आरोग्य चांगले; कचरा स्वत:च साफ करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 10:48 IST

परिसर स्वच्छ असेल तर आरोग्य चांगले राहील, अन्यथा दुर्गंधी व घाणीमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागेल.

ठळक मुद्देकुटुंबीयांच्या आरोग्यासाठी घर व परिसर स्वच्छ ठेवा सार्वजनिक ठिकाणी वा दुसऱ्याच्या घराजवळ कचरा टाकू नका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाची देशभरात दहशत पसरली आहे. बचावासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे’ म्हणीनुसार स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व गोष्टी स्वच्छ असायला पाहिजेत. त्याची सवय प्रत्येकाला असायला हवी. तरच आपले शहर स्वच्छ व सुंदर होईल. आरोग्य चांगले राहील. आपले घर, परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पण काही मोजके नागरिक सोडले तर किती जण ही जबाबदारी पार पाडतात? याचा प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आली आहे.साफसफाई करण्याची महापालिकेची जबाबदारी आहेच. सार्वजनिक ठिकाणी कचरा पडून दिसला की, सफाई कर्मचारी येत नसल्याची महापालिकेकडे तक्रार केली जाते. ती केलीच पाहिजे, पण आपल्या घरातील कचरा कचरागाडीत टाकतो का? घराचा परिसर स्वच्छ ठेवतो का याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. परिसर स्वच्छ असेल तर आरोग्य चांगले राहील, अन्यथा दुर्गंधी व घाणीमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागेल.अनेक जण शिल्लक अन्न घराच्या आजूबाजूला टाकतात. काही तर शेजाऱ्यांच्या ओट्यावर टाकतात. घरातील कचरा, कचरागाडीत न टाकता उघड्यावर फेकतात. यामुळे कचरा फेकणाऱ्यांसोबतच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. बहुमजली इमारतीत वरच्या माळ्यावरील महिला खिडकीतून कचरा खाली फेकतात. यामुळे खाली राहणाऱ्यांना त्रास होतो. अनेकदा तक्रार करूनही सवयी बदललेल्या जात नाही. परंतु यामुळे शेजाऱ्यांसोबतच कचरा फेकणाऱ्यांच्या आरोग्याला तितकाच धोका असतो. मात्र कचरा फेकणाऱ्यांना याचा विसर पडला आहे.

तक्रार करा, दंड होईलसार्वजनिक ठिकाणी, घराच्या आजूबाजूला अनेकजण कचरा टाकतात. घरातील शिळे अन्न आजूबाजूला टाकले जाते. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. असा प्रकार निदर्शनास आल्यास झोन कार्यालयाकडे तक्रार करा, दोषींवर दंडात्मक कारवाई केली जाईल. ओला आणि सुका कचरा विलग करूच द्यावा, हाऊ सिंग सोसायट्यांनी ओल्या कचºयाची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. त्यांनी यापासून कंपोस्ट खत तयार करावे. शहर स्वच्छतेसाठी तसेच आरोग्यासाठी नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये.- डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता)

ओला व सुका कचरा वेगळा कराओला आणि सुका कचरा विलग करून कचरागाडीत टाकला तर त्यावर प्रक्रिया करणे सोयीचे जाते. ओला आणि सुक्या कचऱ्याचे घरच्या घरीच योग्य व्यवस्थापन झाले तर कचऱ्याचे ढीगच्या ढीग डम्पिंगला जाणार नाहीत. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही.हे करता येणे शक्य आहे...घरच्या घरी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती सहज शक्य आहे. मोठ्या सोसायट्यांमध्ये आयताकृती सिमेंटचे खड्डे तयार करून त्यात सोसायटीतील ओला कचरा दिवसांप्रमाणे त्यात टाका, त्यापासून चांगले खत तयार होईल.

मास्क कुठेही टाकू नकासंसर्ग होऊ नये यासाठी नागरिक मास्क वापरत आहेत. वापरलेल्या मास्कची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे. वापरलेले मास्क कागदात गुंडाळून कचरागाडीत टाका, तसेच हॉस्पिटलमध्ये वापरण्यात आलेले मास्क बायोमेडिकल वेस्टमध्येच टाकले जावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

बाजारातील कचरापेट्या नागरिकांसाठीबाजार भागात कचरा होऊ नये यासाठी कचरापेट्या लावण्यात आलेल्या आहेत. मात्र यात दुकानदार कचरा टाकतात. या पेट्या नागरिकांच्या सुविधेसाठी लावण्यात आलेल्या आहेत. दुकानदारांनी कचरा संकलन करून कचरा गाडीत टाकावयाचा आहे.

टॅग्स :SocialसामाजिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस