‘इडा-पिडा, माशी-मोंगशे... घेऊन जा गे मारबत’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:20 AM2019-08-31T00:20:23+5:302019-08-31T00:24:24+5:30

स्वत:तच वेगळेपणा जपणारे आणि नागपूरची स्वत:ची अशी ओळख म्हणून प्रसिद्ध असणारे दोन उत्सव शनिवारी परंपरेनुसार साजरे होणार आहेत. एक आहे, तान्हा पोळा... हा सोहळा नागपूरकर भोसले घराण्याचीच देण आहे तर, दुसरा मारबत महोत्सव..

'Ida-pida, mashi-mongshe ... take along gay marbat' ... | ‘इडा-पिडा, माशी-मोंगशे... घेऊन जा गे मारबत’...

‘इडा-पिडा, माशी-मोंगशे... घेऊन जा गे मारबत’...

googlenewsNext
ठळक मुद्देमारबत-बडग्या : आरिष्टविरोधी सांकेतिक गर्जना आज होणारतान्हा पोळा : बालकांच्या दाटीवाटीने लाकडी नंदींची भरणार जत्रा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वत:तच वेगळेपणा जपणारे आणि नागपूरची स्वत:ची अशी ओळख म्हणून प्रसिद्ध असणारे दोन उत्सव शनिवारी परंपरेनुसार साजरे होणार आहेत. एक आहे, तान्हा पोळा... हा सोहळा नागपूरकर भोसले घराण्याचीच देण आहे तर, दुसरा मारबत महोत्सव.. जो इंग्रजांविरोधातील प्रतिकात्मक क्रांतीचे द्योतक आहे. हे दोन्ही महोत्सव शनिवारी परंपरेनुसार साजरे होणार आहेत आणि त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. 


भोसले राजघराण्यातील एका वंशजाने राजद्रोह करत कपटी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती. त्याचा निषेध म्हणून मारबत महोत्सव आकाराला आला. मात्र, त्या काळात इंग्रजी राजवटीशी उघड उघड संघर्ष करणे शक्य नसल्याने, महाभारतातील श्रीकृष्ण व राक्षशिण पुतना मावशीच्या कथेशी सांगड घालत लोकसंग्रहातून संघर्षाला खतपाणी घालण्यासाठी या महोत्सवाची योजना आखण्यात आली. तेव्हापासून सलग १४० वर्षे हा महोत्सव तेवढ्याच जल्लोषात साजरा होत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवाला पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मार्बत जत्रेसह लोकाभिमुख करण्यात येते. तर, दोनशे-अडिचशे वर्षापूर्वी बालकांसाठीही पोळा भरावा म्हणून राजे भोसले यांनी तान्हा पोळा ही संकल्पना सादर केली आणि तेव्हापासून पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तान्हा पोळा भरतो. यात चिमुकले आपले लाकडी नंदीबैल घेऊन एकत्र येतात आणि पोळा फुटल्यावर घरोघरी जाऊन शेतकऱ्यांप्रमाणे आपला बोजारा मागत असतात. कृषी संस्कृतीविषयी आत्मियता आणि प्रेम अबाधित राहावे, हा यामागचा हेतू.
शनिवारी सकाळी पिवळी व काळी मारबत आपापल्या ठिकाणाहून निघतील. इतवारीत एकत्र येऊन तेथून या महोत्सवाला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते आणि हजारो लोकांच्या एकत्रिकरणातून ‘इडा पिडा टळो, माशि मोंगसे घेऊन जा गे मारबत’ असा जल्लोष केला जातो. या दोन प्रमुख मारबतींसोबतच अन्य आठ मारबती या महोत्सवात सहभागी असतील. मारबत महोत्सवामध्येच देश आणि जगपातळीवर असणाऱ्या प्रमुख समस्यांना प्रतिकात्मक पद्धतीने घेऊन बडगेही सादर होत असतात. यंदा या महोत्सवात २१ बडगे सहभागी होणार असून, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, काश्मीर प्रकरणातील कलम ३७०, महागाई, राष्ट्रीय स्तरावरील राजनेते आणि अन्य प्रश्नांवर हे बडगे सांकेतिकरीत्या भाष्य करतील. त्यानंतर, संध्याकाळच्या सुमारास तान्हा पोळा शहरात सर्वत्र भरेल. महाल येथील भोसले पॅलेसमधील मानाचा पोळा फुटल्यानंतर, राजमहालात असलेल्या अतिभव्य अशा लाकडी नंदीबैलाची मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतरच, शहरातील विविध वस्त्यांमध्ये भरविण्यात येणाऱ्या नंदी बैलांचा पोळा फुटेल.

मारबत मिरवणुकीचा मार्ग
मारबत चौक येथून नवसाची पिवळी मारबत, नेहरू पुतळा येथून काळी मारबत पुढे या दोन्ही मारबती एकत्र येऊन ही यात्रा मारवाडी चौक, अमरदीप सिनेमा, शहीद चौक, गांधी पुतळा, बडकस चौक, केळीबाग मार्ग, कोतवाली, गांधीद्वार, अग्रसेन चौक, गांजाखेत चौक, गोळीबार चौक, भारत माता चौक या मार्गाने मिरवणूक निघेल. त्यानंतर नाईक तलावात विसर्जन करण्यात येईल.

Web Title: 'Ida-pida, mashi-mongshe ... take along gay marbat' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.