‘मी विनायक दामोदर सावरकर’चा एकपात्री प्रयोग रंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:15 IST2019-05-29T23:32:40+5:302019-05-30T00:15:54+5:30
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या प्रेरणेने झपाटून गेलेले सावरकर, ज्वलंत देशभक्ती आणि क्रांतिकारी विचारांना जन्म देणारे सावरकर, त्यांना झालेली जन्मठेपेची शिक्षा आणि तुरुंगामधून झालेली सुटका, असे धगधगते व्यक्तिमत्व विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनचरित्राचा प्रवास नाट्यानुभवातून मांडण्यात आला.

‘मी विनायक दामोदर सावरकर’चा एकपात्री प्रयोग रंगला
नाशिक : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या प्रेरणेने झपाटून गेलेले सावरकर, ज्वलंत देशभक्ती आणि क्रांतिकारी विचारांना जन्म देणारे सावरकर, त्यांना झालेली जन्मठेपेची शिक्षा आणि तुरुंगामधून झालेली सुटका, असे धगधगते व्यक्तिमत्व विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनचरित्राचा प्रवास नाट्यानुभवातून मांडण्यात आला.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शहर निवृत्त बँक कर्मचारी मंचातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३६व्या जयंतीनिमित्त ‘मी विनायक दामोदर सावरकर’ या एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेते योगेश सोमण यांनी या नाट्यविष्कारातून सावरकरांचे बालपण, अभिनव भारतची स्थापना, काळ्या पाण्याची शिक्षा, अशा सावरकरांच्या आयुष्यातील निरनिराळ्या टप्प्यांना त्यांनी रंगमंचावर जिवंत केले. सावरकर यांच्या जीवनसंघर्षातील विविध प्रसंगांना चित्रफितींमधून उजाळा देण्यात आला. प्रतिमापूजन करण्यात आले. नरेंद्र ताटके यांनी प्रास्ताविक केले. सुभाष प्रधान यांनी आभार मानले.