शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मी राजीनामा देऊन बॅलेटवर निवडणूक लढण्यास तयार

By कमलेश वानखेडे | Updated: December 6, 2024 18:04 IST

Nagpur : नाना पटोले यांनी भाजपचे आव्हान स्वीकारले

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ईव्हीएमच्या माध्यमातून लोकांचा मताचा अधिकार चोरला जात आहे, अशी जनतेची भावना आहे. ही प्रक्रिया संशय निर्माण करणारी आहे. यात निवडणूक आयोगाने सुधारणा करावी. मते चोरली जात असतील तर ही भूमिका मान्य करावी. मला आव्हान देणाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडून बॅलेटवर पुन्हा निवडणूक घेणारे पत्र आणावे, मी राजीनामा देऊन बॅलेटवर निवडणूक लढण्यास तयार आहे, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेत्यांचे आव्हान स्वीकारले.

नाना पटोले शुक्रवारी नागपुरात पत्रकारांना म्हणाले, ईव्हीएमविरोधात आता जनताच आवाज उठवत आहे. मारकडवाडीत सरकारने मतदान का होऊ दिले नाही, कशाची भीती होती. नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून आवाजी मतदानाने निर्णय कायदे होत आहेत. राहुल गांधी यांच्या भूमिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे. २२० लाख कोटींचे कर्ज मोदींच्या राज्यात झाले. काँग्रेसने आर्थिक व्यवस्था सांभाळली होती, असेही पटोले म्हणाले. राज्यसभेत नोटा मिळाल्या असतील तर सभापतींना कारवाईचे अधिकार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्रिपद घेऊन शिंदे खूश आहेत का, हे त्यांचा चेहराच सांगतो आहे. त्यांचे चेहरे कसे आहेत यात आपल्याला पडायचं नाही. पण महाराष्ट्र प्रगत राज्य व्हावे, हे राज्य गुजरातकडे जाऊ नये, तर महाराष्ट्र सुसाट जावा. नवीन सरकारकडून जनतेला अनेक अपेक्षा आहेत, असेही त्यांनी सांगितले.

प्रतोद नियुक्तीसाठी अध्यक्षांना पत्र देणारकाँग्रेस पक्षाचा प्रतोद कोण असेल याबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले जाईल. अधिवेशनापूर्वी हा प्रश्न सुटेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बंटी शेळके यांनी केलेल्या आरोपांबाबत ही पक्षांतर्गत बाब असल्याचे सांगत पटोले यांनी अधिक बोलणे टाळले. शपथविधीचे निमंत्रण असते तर गेलो असतो. महायुती सरकारच्या शपथविधीचा निरोप कोणाला दिला याची माहिती नाही. महाराष्ट्राची परंपरा आहे, आम्हाला बोलावले नाही, बोलावले असते तर गेलो असतो, असे पटोले यांनी स्पष्ट केले. फडणवीस मुख्यमंत्री झाले यासाठी शुभेच्छा. महाराष्ट्र पुढे जावा, तरुणांना न्याय मिळावा, आमचा मित्र महाराष्ट्रासाठी काम करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेBJPभाजपाcongressकाँग्रेसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस