लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात प्रत्येक नववी व्यक्ती उच्च रक्तदाब म्हणजे ‘हायपरटेन्शन’च्या विळख्यात आहे. कोणत्याही लक्षणांशिवाय अचानक आढळून येणाऱ्या आजाराला 'सायलंट किलर' म्हणूनही ओळखले जाते. मेंदू, डोळे, हृदय, मूत्राशय अशा जवळपास सर्वच अवयवांवर या आजाराचा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. म्हणूनच हृदयाची नियमित तपासणी व ‘बीपी’ची औषधे नियमित घेणे व कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद न करण्याचा सल्ला हृदयरोग तज्ज्ञानी दिला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या ग्रामीण भागात गेल्या दहा महिन्यात ८८२३ रुग्णांची नोंद झाली आहे.जगात एक कोटी म्हणजे २५ टक्के लोक उच्चरक्तदाबाने पीडित आहे. ‘वर्ल्ड हायपरटेन्शन लीग’नुसार दरवर्षी जगात या आजारामुळे ७५ लाख लोकांचा मृत्यू होतो. भारतात २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या २३.१ टक्के पुरुष तर २२.६ टक्के महिला या आजाराने पीडित आहेत. भारतात या आजाराचे १३ कोटी ९० लाख रुग्ण आहेत. यामुळे आता या आजाराची नोंदही ठेवली जात आहे. ‘फिट’कडून ‘अनफिट’कडे आपण जात असल्याने या आजाराचे रुग्णही वाढताना दिसून येत असल्याचे हृदयरोग तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ‘बैठी जीवनशैली’ही याला कारणीभूत आहे. ज्यांचे ‘फिटनेस’ कमी आहे, त्यांच्या हृदयाचे मसल जाड. यामुळे सुरुवातीपासून मीठ कमी खा. नियमित व्यायाम करा. विशेष म्हणजे या दोन्ही गोष्टीमंध्ये सातत्य ठेवल्यास याचा परिणाम दिसून येत असल्याचेही तज्ज्ञाचे म्हणणे आहे.जीवनशैलीतील बदल काळाची गरज-डॉ. जुनेजा
प्रत्येक नवव्या व्यक्तीला हायपरटेन्शन : जिल्ह्यात ८८२३ रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:02 IST
भारतात प्रत्येक नववी व्यक्ती उच्च रक्तदाब म्हणजे ‘हायपरटेन्शन’च्या विळख्यात आहे. कोणत्याही लक्षणांशिवाय अचानक आढळून येणाऱ्या आजाराला 'सायलंट किलर' म्हणूनही ओळखले जाते. मेंदू, डोळे, हृदय, मूत्राशय अशा जवळपास सर्वच अवयवांवर या आजाराचा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. म्हणूनच हृदयाची नियमित तपासणी व ‘बीपी’ची औषधे नियमित घेणे व कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद न करण्याचा सल्ला हृदयरोग तज्ज्ञानी दिला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या ग्रामीण भागात गेल्या दहा महिन्यात ८८२३ रुग्णांची नोंद झाली आहे.
प्रत्येक नवव्या व्यक्तीला हायपरटेन्शन : जिल्ह्यात ८८२३ रुग्णांची नोंद
ठळक मुद्देकेवळ १५ टक्केच लोकांचे रक्तदाब नियंत्रणात