नागपूर विमानतळावर ५ कोटींचे 'हायड्रोपोनिक' ड्रग्ज केले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 14:42 IST2025-11-01T14:40:28+5:302025-11-01T14:42:51+5:30

Nagpur : डीआरआय, एसआयआयबीची संयुक्त कारवाई; बँकॉकहून आणली खेप

'Hydroponic' drugs worth Rs 5 crore seized at Nagpur airport | नागपूर विमानतळावर ५ कोटींचे 'हायड्रोपोनिक' ड्रग्ज केले जप्त

'Hydroponic' drugs worth Rs 5 crore seized at Nagpur airport

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पहाटे तब्बल पाच कोटी रुपयांचे 'हायड्रोपोनिक मारिजुआना' हे प्रतिबंधित ड्रग्ज जप्त करण्यात आले. कतार एअरवेजच्या दोहा-नागपूर फ्लाइट (क्यूआर ५९०) मधून आलेल्या एका प्रवाशाजवळ हे ड्रग्ज आढळल्याने विमानतळावर खळबळ उडाली आहे.

डीआरआय (डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) आणि कस्टम्सच्या विशेष इंटेलिजन्स व इव्हेस्टिगेटिव्ह ब्रँचने (एसआयआयबी) संयुक्तरीत्या ही कारवाई केली. डीआरआयला पूर्वीच मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विमानतळावर त्या प्रवाशाची सखोल तपासणी करण्यात आली. त्याच्या बॅगेतून सुमारे पाच किलो ड्रग्ज आढळले. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे पाच कोटी रुपये इतकी आहे.

आरोपीने ही खेप थायलंडची राजधानी बँकॉक येथून घेतली होती. त्यानंतर तो उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद, तेथून दोहा आणि शेवटी नागपूर येथे आला. पकडण्यात आलेले ड्रग्ज चरस, गांजा आणि भांगपेक्षा अधिक प्रभावी असून त्याचा मानवी मेंदूवर झपाट्याने परिणाम होतो. हे ड्रग्ज प्रामुख्याने आग्नेय आशियाई देशांत तयार केले जाते. रेव्ह पार्थ्यांमध्ये 'हाय-क्लास ड्रग्ज' म्हणून या पदार्थाला मोठी मागणी असते. या घटकात 'टेट्राहायड्रोकॅनाबिनोल' (टीएचसी) चे प्रमाण साध्या गांजापेक्षा अधिक असल्याने व्यसनाधीनतेकडे झपाट्याने कल होतो.

हायड्रोपोनिक मारिजुआना म्हणजे काय?

मातीऐवजी पाण्यात पोषकतत्त्वे देऊन झाडे वाढविण्याच्या आधुनिक पद्धतीला हायड्रोपोनिक शेती म्हणतात. या तंत्रात उगवलेले 'हायड्रोपोनिक मारिजुआना' साध्या गांजापेक्षा अधिक तीव्र आणि जलद नशा देणारे असते. त्यात टेट्राहायड्रोकॅनाबिनोल (THC) चे प्रमाण जास्त असल्याने मेंदूवर थेट परिणाम होतो. त्यामुळे हे ड्रग्ज अत्यंत धोकादायक आणि व्यसनकारक मानले जाते.

दुसरी मोठी कारवाई

आरोपीची चौकशी सुरू असून त्यामागील आंतरराष्ट्रीय साखळीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, २० ऑगस्ट २०२३ रोजी नागपूर विमानतळावर ३ किलो ७० ग्रॅम फेटामाइन ड्रग्जचा तब्बल २४ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर अल्पावधीतच झालेली ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे.

Web Title : नागपुर हवाई अड्डे पर 5 करोड़ रुपये के हाइड्रोपोनिक ड्रग्स जब्त

Web Summary : नागपुर हवाई अड्डे पर दोहा से आए एक यात्री से 5 करोड़ रुपये के हाइड्रोपोनिक मारिजुआना जब्त किए गए। बैंकॉक से प्राप्त ड्रग्स शक्तिशाली और खतरनाक हैं, हाल ही में 24 करोड़ रुपये की जब्ती के बाद यह दूसरी बड़ी ड्रग्स जब्ती है।

Web Title : Nagpur Airport: ₹5 Crore Hydroponic Drugs Seized from Passenger

Web Summary : ₹5 crore worth hydroponic marijuana seized at Nagpur airport from a passenger arriving from Doha. The drugs, sourced from Bangkok, are potent and dangerous, leading to a second major drug bust after a recent ₹24 crore seizure.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.