नागपुरात पतीने केली पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:23 IST2018-07-17T00:23:13+5:302018-07-17T00:23:55+5:30

घरगुती वाद विकोपाला गेल्याने दारुड्या नवऱ्याने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली. इंदिरा अशोक चौधरी (वय ५०) असे मृत महिलेचे तर अशोक गुलाब चौधरी (वय ५६) असे आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी ही थरारक घटना घडली.

The husband murdered wife in Nagpur | नागपुरात पतीने केली पत्नीची हत्या

नागपुरात पतीने केली पत्नीची हत्या

ठळक मुद्देघरगुती वाद भोवला : एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरगुती वाद विकोपाला गेल्याने दारुड्या नवऱ्याने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली. इंदिरा अशोक चौधरी (वय ५०) असे मृत महिलेचे तर अशोक गुलाब चौधरी (वय ५६) असे आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी ही थरारक घटना घडली.
चौधरी कुटुंबीयांचे घर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसासनी गावाच्या पंचशीलनगरात आहे. इंदिरा यांच्या नावे त्यांचे राहते घर आहे. ते विकण्याचा तगादा आरोपी अशोकने लावला होता. घर विकून कुठे जायचे, मुलगा-सून कुठे राहणार, असा प्रश्न असल्याने इंदिरा घर विकण्यास नकार देत होत्या. त्यामुळे त्यांच्या घरात नेहमी वाद होत होते. आरोपी अशोक चौधरीने घर विकण्याचा अनेकांना निरोप दिला. त्यामुळे त्या कागदपत्रांवर इंदिरा यांनी सही करावी, असा तगादा आरोपीने लावला होता. सोमवारी सायंकाळी ६ वाजता याच मुद्यावरून पती-पत्नीत वाद झाला. तो विकोपाला गेल्यानंतर आरोपीने बाजूचे फावडे उचलले आणि इंदिरा यांच्या डोक्यावर तीन फटके मारले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांची सून प्रेमलता नागेश चौधरी हिने आरडाओरड करून शेजाºयांना गोळा केले. एमआयडीसी पोलिसांनाही माहिती दिली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपीची चौकशी सुरू होती.

Web Title: The husband murdered wife in Nagpur