थप्पड! नवऱ्याने बायकोच्या कानशिलात लगावली; मग तीही पेटली आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 20:03 IST2022-01-11T20:01:04+5:302022-01-11T20:03:25+5:30

Nagpur News घरगुती वादातून पतीने पत्नीच्या कानशिलात लगावली म्हणून पत्नी संतप्त झाली अन् तिने पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मयुरी (वय २६) असे पत्नीचे नाव आहे.

The husband hit his wife; She insisted on taking strict action in front of the police ... | थप्पड! नवऱ्याने बायकोच्या कानशिलात लगावली; मग तीही पेटली आणि...

थप्पड! नवऱ्याने बायकोच्या कानशिलात लगावली; मग तीही पेटली आणि...

नागपूर - घरगुती वादातून पतीने पत्नीच्या कानशिलात लगावली म्हणून पत्नी संतप्त झाली अन् तिने पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मयुरी (वय २६) असे पत्नीचे नाव आहे.

मयुरी आणि तिचा पती गिट्टीखदानमध्ये राहतात. घरगुती वादातून त्यांच्यात रविवारी सकाळी १०.३० वाजता कडाक्याचे भांडण झाले. ते टोकाला गेल्यानंतर देवव्रतने मयुरीच्या कानशिलात लगावली. त्यामुळे ती तडक गिट्टीखदान ठाण्यात पोहचली. मारहाण करणाऱ्या पतीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी तिने लावून धरली. पोलिसांनी पतीला बोलवून समज दिली. मयुरीचेही समुपदेशन केले. मात्र, पतीवर कारवाई झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा पवित्रा तिने घेतला. तिच्या हट्टापोटी शेवटी पोलिसांनी पतीविरुद्ध मारहाण करून धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला.

---

Web Title: The husband hit his wife; She insisted on taking strict action in front of the police ...