पती पाठाेपाठ पत्नीनेही साेडला प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:08 IST2021-04-09T04:08:44+5:302021-04-09T04:08:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : पती-पत्नी दाेघेही वृद्ध व आजारी. दाेघेही एकमेकांची सुश्रुषा करून काळजी घेत हाेते. अशातच गुरुवारी ...

पती पाठाेपाठ पत्नीनेही साेडला प्राण
लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : पती-पत्नी दाेघेही वृद्ध व आजारी. दाेघेही एकमेकांची सुश्रुषा करून काळजी घेत हाेते. अशातच गुरुवारी (दि.८) पहाटेच्या सुमारास पतीचे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच त्यांच्या पत्नीनेही प्राण त्यागला. नरखेड शहरात गुरुवारी सकाळी ही दु:खद घटना घडली असून, कमलकिशाेर उपाख्य रावसाहेब खुटाटे (७७) व त्यांच्या पत्नी विमलादेवी खुटाटे (७०) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. वृद्ध दाम्पत्याच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त हाेत आहे.
खुटाटे दाम्पत्य एकमेकांच्या साेबतीने नरखेड येथे वास्तव्यास हाेते. त्यांना पाच मुली व मुलगा आहे. मुलगा छत्तीसगड येथे राहताे तर मुली लग्न हाेऊन सासरी राहतात. दोघेही वृध्द व आजारी असल्याने एकमेकांची सुश्रुषा करुन काळजी घेत होते. ‘जियेंगे तो साथ, मरेंगे तो साथ’ असे ते नेहमी गमतीने म्हणत असत. त्यांचे म्हणणे दोघांच्या मृत्युमुळे आज खरे ठरले. नरखेड तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या संघटन वाढीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. दरम्यान गुरुवारी सायंकाळी स्थानिक स्मशानभूमीत नातू नीरजने मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.