शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोंडवाना संग्रहालयाच्या निर्मितीचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 01:33 IST

शासनाने आंतराष्ट्रीय दर्जाच्या गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालयासाठी सुराबर्डी येथे १० एकर जागा मंजूर केल्याने संग्रहालयाच्या निर्मितीचा मार्ग सुकर झाला आहे.

ठळक मुद्देसुराबर्डीत मिळाली १० एकर जागा : जागेसाठी समाजाचा १६ वर्षाचा संघर्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासींचे कलाजीवन सांस्कृतिक जतन व संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोंडावाना सांस्कृतिक संग्रहालय उभारण्यासाठी शासनाने २००२ ला मान्यता दिली होती. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून हे संग्रहालय उभारण्यात येणार होते. केंद्राने यासाठी २१ कोटी रुपयांचा निधी शासनाला उपलब्ध करून दिला होता. पण आदिवासी विभागाला या केंद्रासाठी १६ वर्षे जागाच उपलब्ध झाली नाही. यासंदर्भात लोकमतने ही वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले होते. अखेर शासनाने आंतराष्ट्रीय दर्जाच्या गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालयासाठी सुराबर्डी येथे १० एकर जागा मंजूर केल्याने संग्रहालयाच्या निर्मितीचा मार्ग सुकर झाला आहे. नागपूर नगरीचे निर्माते गोंड राजे बक्त बुलंद शाह यांच्या नगरीत आणि मुख्यमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात जागा भेटत नसल्यामुळे आदिवासी समाजात असंतोष पसरला होता. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर विभागातर्फे या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करून, निवेदन देऊन, आदिवासी विकास विभागाला घेराव करून मागणी रेटून धरली होती. यासाठी केंद्र सरकारने सन २०१४ मध्ये १० कोटी व सन २०१५ मध्ये ११ कोटी रुपये मंजूर केले होते. पण जागाच उपलब्ध होत नव्हती. सुरुवातीला नागपूर विद्यापीठाची जागा, मौजा चिखली येथील जागा, सिव्हील लाईनस्थित अपर आयुक्त यांचा बंगला, शासकीय दूध योजना येथील जागा, गोरेवाडास्थित जागा या ठिकाणी गोंडवाना संग्रहालय व्हावे यासाठी प्रशासनाकडून जागा सुचविल्या होत्या. पण प्रत्येक वेळी जागेला घेऊन अडचणी येत होत्या. अखेर सरकारने सुराबर्डी, अमरावती रोड नागपूर येथील १० एकर जागा मंजूर केली आहे. १६ वर्षानंतर समाजाच्या लढ्याला यश आले आहे. काय असणार संग्रहालयाचे वैशिष्ट्यगोंडवाना सांस्कृतिक संग्रहालयात आदिवासी जीवन कला व संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या मौल्यवान व दुर्मिळ वस्तूंचा संग्रह, आदिवासींचे दागदागिने, देवदेवता, मुखवटे, दैनंदिन वापराच्या वस्तू, आदिवासी पारंपरिक शेतीसाठी वापरणाºया वस्तू, हत्यारे, पारंपरिक पोशाख, आदिवासी दुर्मिळ साहित्य, लेखन, गीत/पाटा, गोंडी व इतर आदिवासी बोली भाषा संवर्धन करण्यात येणार आहे. तसेच वाचन कक्ष, नृत्य व पारंपरिक कला दालन, आदिवासी खाद्य संस्कृती, वनौषधी व इतर पारंपरिक उत्पादन यांना बाजारपेठ इत्यादींचा समावेश राहणार आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूर