शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांची उपासमार थांबणार!

By admin | Updated: March 5, 2016 03:06 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) पाकगृहात तोकड्या कर्मचारी संख्येमुळे रुग्णांना अर्धपोटी रहावे लागते होते.

मेडिकल : पोळी तयार करण्याचे घेतले यंत्र नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) पाकगृहात तोकड्या कर्मचारी संख्येमुळे रुग्णांना अर्धपोटी रहावे लागते होते. नियमांना बगल देत पोषक आहाराऐवजी केवळ मोजकाच आणि तोही निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. तब्बल दोन महिन्यानंतर याची दखल मेडिकल प्रशासनाने घेतली. शासन कर्मचाऱ्यांची संख्या वाढवित नसल्याचे पाहत पोळ्या बनविणारे ‘रोटीमेकर’च विकत घेतले. ३ लाख ५० हजार रुपयांच्या या मशीनमधून एका तासांत ८०० पोळ्या बाहेर पडतात.मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्य रुग्णांना औषधोपचारांसह पौष्टिक आहार मिळावा यासाठी रुग्णालयाच्या स्थापनेपासूनच पाकगृह सुरू आहे. मेडिकलसह सुपर स्पेशालिटी रुग्णालय व टीबी वॉर्डातील असे एकूण सुमारे ८०० रुग्णांना नाश्तासह दोन वेळेचे जेवण दिले जाते. रुग्णांच्या जेवणात तूर किंवा मसुरीचे वरण, भात, भाजी, पोळी असा नेहमीचा मेनू ठरला आहे. रुग्णांचा आहार आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात यावा, असा नियम आहे. परंतु येथे सर्वच नियमाना हरताळ फासला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ९ डिसेंबर २०१५ च्या अंकात ‘मेडिकलमध्ये रुग्णांची उपासमार’ प्रसिद्ध केले होते.(प्रतिनिधी)मुख्य सचिवांच्या निर्देशालाही बगलहिवाळी अधिवेशन काळात वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे, या विभागाच्या सचिव मेधा गाडगीळ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. प्रवीण शिनगारे हे सर्वच शहरात उपस्थित असतानाही मेडिकलच्या रुग्णांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असल्याचे वास्तव मांडले. याची दखल मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी घेतली. त्यांनी त्या काळात मेडिकलसह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पाहणी करताना रुग्णाच्या आहाराकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले. रुग्णांच्या आहाराची काळजी घ्या, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मात्र पुढे या निर्देशाचे पालनच झाले नाही.संचालकांचे आश्वासनही गुलदस्त्यातयाच वृत्ताला घेऊन ‘लोकमत’शी बोलताना वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितले, मेडिकलच्या पाकगृहासंदर्भात शासन गंभीर आहे. ५० पदे मंजूर असताना केवळ १९ कर्मचाऱ्यांवर ८०० रुग्णांचा भार आहे. स्वयंपाकीची पदे लवकरात लवकर भरण्यात येईल, या शिवाय प्रति रुग्णाच्या नाश्त्यासह दोन वेळेच्या आहारावर शासन खर्चात २५ रुपयांची वाढ करण्यावरही विचार केला जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतु अधिवेशन संपून दोन महिन्याचा कालावधी होऊनही कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात आलेली नाही. परिणामी, कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या असली तरच रुग्णांना दोन पोळ्या मिळत होत्या. अन्यथा एका पोळीवर तर अनेकवेळा पोळीविनाच आहारावर समाधान मानावे लागत होते.कर्मचाऱ्यांच्या तोकड्या संख्येवर ‘रोटीमेकर’ तोडगा अखेर मेडिकल प्रशासनाने यावर प्रभावी तोडगा म्हणून पोळ्या बनविणारी मशीनच घेण्याचा निर्णय घेतला. त्या प्रमाणे शुक्रवारी मेडिकलमध्ये एक अत्याधुनिक ‘रोटीमेकर’ आले आहे. कणकीचा गोळा बनवून त्यात टाकल्यास पोळ्या तयार होऊन आपोआप बाहेर पडतात. पूर्वी पोळ्या बनविण्यासाठी दहा कर्मचारी लागायचे. आता ‘रोटीमेकर’ चालविण्यासाठी दोन किंवा तीन कर्मचारीच लागणार आहेत. शनिवारी या ‘रोटीमेकर’चे अधिकृत उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.