मृत्यूच्या दारातही जपली माणुसकी; गडचिरोलीच्या शिपायाने तिघांना दिले जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 13:44 IST2026-02-20T13:42:56+5:302026-02-20T13:44:39+5:30

Gadchiroli : नियतीचा घाला कधी आणि कसा येईल हे सांगता येत नाही. गडचिरोली येथे शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असलेले ४८ वर्षीय रमेश निसार सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कर्तव्यावर जाण्यासाठी घरून निघाले.

Humanity preserved even at the door of death; Gadchiroli soldier gave life to three people | मृत्यूच्या दारातही जपली माणुसकी; गडचिरोलीच्या शिपायाने तिघांना दिले जीवनदान

Humanity preserved even at the door of death; Gadchiroli soldier gave life to three people

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
नियतीचा घाला कधी आणि कसा येईल हे सांगता येत नाही. गडचिरोली येथे शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असलेले ४८ वर्षीय रमेश निसार सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कर्तव्यावर जाण्यासाठी घरून निघाले. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या रमेश यांच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार सुरू होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. उपचारादरम्यान त्यांचा मेंदू मृत (ब्रेनडेड) घोषित झाल्यानंतर, दुःखाच्या डोंगराखाली असलेल्या त्यांच्या पत्नीने आणि कुटुंबाने धैर्याने अवयवदानाचा निर्णय घेतला, ज्यामुळे तीन गरजू रुग्णांना नवे आयुष्य मिळाले.

१६ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर रमेश निसार यांना तातडीने गडचिरोली आणि त्यानंतर नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना अखेर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. मात्र, मेंदूतील अतिरक्तस्त्रावामुळे त्यांची प्रकृती सुधारू शकली नाही.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने सर्व निकष तपासून त्यांना 'ब्रेनडेड' घोषित केले. मेडिकलमधील अवयवदान समन्वयक डॉ. सुमित चाहाकार आणि श्याम पांजाला यांनी निसार कुटुंबाचे समुपदेशन केले. पतीच्या निधनाचे अतिव दुःख असतानाही, पत्नी मोसमी निसार यांनी खंबीर होत सामाजिक बांधिलकी जपली. त्यांनी रमेश यांचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान करण्यास लेखी संमती दिली.

या निर्णयाला त्यांचे भाऊ विजय निसार आणि वहिनी विशाखा ठाकरे यांनीही पाठिंबा दिला. 'झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर'चे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. राहुल सक्सेना यांच्या मार्गदर्शनात समन्वयक दिनेश मंडपे यांनी अवयवदानाची पुढील प्रक्रिया पूर्ण केली.

असे झाले अवयवांचे वाटप

'झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर' (झेडटीसीसी) नागपूर समितीने राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार यकृत न्यू एरा हॉस्पिटल, नागपूर येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाला, पहिली किडनी मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ३९ वर्षीय महिलेला, तर दुसरी किडनी एस. एस. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील ३८ वर्षीय पुरुषाला दान करण्यात आली.

सन्मान कॉरिडॉर आणि श्रद्धांजली

अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. सोमा चाम, डॉ. प्रणाली गुरुकार, डॉ. निखील काकानी, डॉ. नेहा बोरकर आणि कर्मचारी वगार्ने 'सन्मान कॉरिडॉर' तयार करून रमेश निसार यांच्या पार्थिवाला मानवंदना दिली.
त्यांच्या या दातृत्वाचा सन्मान म्हणून झेडटीसीसी नागपूरमार्फत त्यांचे पार्थिव गडचिरोली येथे विनामूल्य रुग्णवाहिकेने पोहोचवण्यात आले.

Web Title : गढ़चिरोली के चपरासी का अंगदान: मृत्यु में भी मानवता की जीत

Web Summary : दुर्घटना में ब्रेन डेड घोषित हुए गढ़चिरोली के स्कूल चपरासी रमेश निसार ने अंगदान से तीन लोगों को नया जीवन दिया। उनकी पत्नी और परिवार के साहसिक निर्णय से नागपुर के अस्पतालों में रोगियों को आशा मिली, जिन्होंने उनके लीवर और किडनी दान किए।

Web Title : Gadchiroli Peon's Organ Donation: Humanity Prevails Even in Death

Web Summary : Gadchiroli school peon Ramesh Nisar, declared brain dead after an accident, gave new life to three people through organ donation. His wife and family's courageous decision to donate his liver and kidneys offered hope to recipients in Nagpur hospitals.