जी-२० परिषदेची जय्यत तयारी; रस्ते गुळगुळीत, जिकडेतिकडे फुले, हिरवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 12:53 PM2023-03-11T12:53:13+5:302023-03-11T12:57:07+5:30

नागपूर विमानतळ परिसरात सुशोभीकरणाला गती

huge preparations for the G-20 Summit; beautification in Nagpur International airport area | जी-२० परिषदेची जय्यत तयारी; रस्ते गुळगुळीत, जिकडेतिकडे फुले, हिरवळ

जी-२० परिषदेची जय्यत तयारी; रस्ते गुळगुळीत, जिकडेतिकडे फुले, हिरवळ

googlenewsNext

नागपूर :नागपूर शहरात २० ते २२ मार्च दरम्यान जी-२० परिषदेंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या सी-२० परिषदेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात सुशोभीकरणाच्या कामांना गती आली आहे. आकर्षक वृक्षांची लागवड, राष्ट्रध्वजांसाठी उभारण्यात आलेले खांब, परिसरातील भिंतीवर चितारण्यात येत असलेली आकर्षक चित्रे आदी कामे गतीने सुरू आहेत.

सी-२० परिषदेसाठी येणाऱ्या देश- विदेशातील प्रतिनिधींचे आगमन येथील विमानतळावर होणार आहे. या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळ परिसर सज्ज होत आहे. महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरणाने विमानतळ परिसरात सुशोभीकरणाच्या कामाला गती दिली आहे. विमानतळातून बाहेर पडल्यापासून जवळपास १ किमी अंतरापर्यंतच्या परिसरात विविध प्रजातींची फुलझाडे लावण्यात येत आहेत. विमानतळातून बाहेर पडताच लावण्यात आलेल्या नाम फलकाखालील परिसरात वर्तुळाकार, त्रिकोणी आणि विविध आकाराची टॉपअरी झाडे लावण्यात येत आहेत.

विमानतळापासून प्राईडपर्यंतच्या जवळपास १ किमीपर्यंतच्या रस्त्याच्या दुभाजकावर मालाफिजीया ही वेटोळ्या आकारातील वृक्ष लावण्यात आली आहेत. याच रस्त्यावर मोकाच्या ठिकाणी जी-२० परिषदेच्या सदस्य राष्ट्रांचे ध्वज लावण्यासाठी दुतर्फा ध्वजांचे खांब उभारण्यात आले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा ८-९ फूट उंचीचे कोणाकार्पस वृक्ष लावण्यात येत आहेत. रंगीबेरंगी फुलांची ३ मीटर रुंद आणि जवळपास १ किमी लांबीची पुष्पपट्टीकाही लावण्यात येत आहे. 

टर्मिनल मेनडोम परिसरात टायगर कॅपिटल आणि संत्रानगरी ही नागपूरची ओळख दर्शविणाऱ्या आकर्षक प्रतिमा येथे साकारण्यात येणार आहेत. तसेच व्हर्टिकल गार्डन, नागपुरात आपले स्वागत आहे, हा संदेश असणारे मोठे फलक लक्ष वेधत आहेत. 

Web Title: huge preparations for the G-20 Summit; beautification in Nagpur International airport area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.