हावडा-पुणे, हावडा-मुंबई, हावडा-अमहदाबादच्या वेळेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:25 IST2020-12-04T04:25:13+5:302020-12-04T04:25:13+5:30
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२२२२ हावडा-पुणे द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी ५ डिसेंबरपासून गुरुवारी आणि शनिवारी सकाळी ५.४० ...

हावडा-पुणे, हावडा-मुंबई, हावडा-अमहदाबादच्या वेळेत बदल
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२२२२ हावडा-पुणे द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी ५ डिसेंबरपासून गुरुवारी आणि शनिवारी सकाळी ५.४० वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला रात्री ८.५० वाजता येऊन पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ९.४० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०२२२१ पुणे-हावडा द्वि साप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी पुण्यावरून ७ डिसेंबरपासून शनिवारी आणि सोमवारी सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता येऊन हावडाला रात्री ८.१० वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२८१० हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ही गाडी ५ डिसेंबरपासून दररोज सायंकाळी ७.४५ वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी १.५५ वाजता आणि तिसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पहाटे ४.२५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०२८०९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हावडा ही गाडी ७ डिसेंबरपासून दररोज रात्री ९.१० वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२० वाजता आणि हावडाला हावडाला तिसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२८३४ हावडा-अहमदाबाद ही गाडी दररोज हावडावरून ५ डिसेंबरपासून रात्री ११.४५ वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.५५ वाजता आणि अहमदाबादला दुपारी १२.१५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०२८३३ अहमदाबाद-हावडा विशेष रेल्वेगाडी ८ डिसेंबरपासून रात्री १२.१५ वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला सायंकाळी ६ वाजता आणि दुसऱ्या दिवशी हावडाला दुपारी १.३५ वाजता पोहोचेल. या गाड्यांच्या वेळेत झालेला बदल लक्षात घेऊन प्रवाशांनी आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
..............