शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

दातृत्वाचा असाही आदर्श!

By admin | Updated: November 13, 2014 00:55 IST

मनमिळावू, सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या जवळच्या व्यक्तीचे अचानक निधन झाले तर हसत्याखेळत्या कुटुंबावर अक्षरश: वज्राघातच होतो. यातून सावरणे मोठमोठ्यांना फार अवघड जाते.

मृत प्राध्यापिकेच्या कुटुंबीयांचा पुढाकार नागपूर : मनमिळावू, सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या जवळच्या व्यक्तीचे अचानक निधन झाले तर हसत्याखेळत्या कुटुंबावर अक्षरश: वज्राघातच होतो. यातून सावरणे मोठमोठ्यांना फार अवघड जाते. परंतु या परिस्थितीतदेखील समाजाप्रति आपण काहीतरी देणे लागतो ही भावना जपणाऱ्या व्यक्ती व कुटुंब फारच थोडी. सुरेंद्रनगर येथील दामोदर ले-आऊट येथील रहिवासी चंद्रकांत झोटिंग यांच्या पत्नी दीपाली यांचे अल्प आजाराने बुधवारी निधन झाले. परंतु खचून न जाता झोटिंग कुटुंबीयांनी त्यांचे नेत्रदान व किडनीदान करण्याचा निर्णय घेतला व समाजासमोर प्रेरणादायी आदर्श प्रस्थापित केला.दीपाली झोटिंग या रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. करिअरसोबतच त्यांचे घराकडेदेखील पूर्ण लक्ष राहायचे व कुटुंबातील सर्वांना काय हवे, काय नको याची त्या काळजी घ्यायच्या. समाजकार्यातदेखील त्या अग्रेसर असायच्या. सर्वकाही सुरळीतपणे सुरू असताना अचानक काही दिवसांअगोदर त्यांना ‘ब्रेनस्ट्रोक’ झाला. त्यांच्या मेंदूला होणारा रक्तपुरवठा जवळपास बंद झाला होता. अनेक दिवस ‘व्हेंटीलेटर’वर काढल्यावर अखेर डॉक्टरांनी आज त्यांना मृत घोषित केले.त्यांचे पती, आठ वर्षीय मुलगा आर्यन, आई-वडील व इतर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. दु:खावेग अनावर होत असतानादेखील चंद्रकांत झोटिंग यांनी मनाशी निश्चय केला. पत्नी जरी जगातून निघून गेली असली तरी तिचे नेत्र व किडनी यामुळे गरजवंतांच्या आयुष्यात प्रकाश येईल, या भावनेतून त्यांनी दीपाली झोटिंग यांचे नेत्र व किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली. कुटुंबीयांनीदेखील त्यांना होकार दिला. त्यांच्या या निर्णयामुळे तीन रुग्णांना लाभ होणार आहे. सर्व वैद्यकीय प्रक्रिया आटोपल्यानंतर दीपाली झोटिंग यांच्या पार्थिवावर १३ नोव्हेंबर रोजी सहकारनगर घाट येथे दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.(प्रतिनिधी)