कसे होणार लसीकरण? तुटवडा कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 21:37 IST2021-05-15T21:36:19+5:302021-05-15T21:37:50+5:30
vaccination problem कोरोनाच्या नियंत्रणासाठी लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे; परंतु लसीकरणाचा तुटवडा मात्र अजूनही संपलेला नाही. शनिवारी नागपूर जिल्ह्याला केवळ २९०० लसीचा डोस प्राप्त झाला. यामुळे लसीकरणाचा कोटा पूर्ण होणार तरी कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कसे होणार लसीकरण? तुटवडा कायम!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या नियंत्रणासाठी लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे; परंतु लसीकरणाचा तुटवडा मात्र अजूनही संपलेला नाही. शनिवारी नागपूर जिल्ह्याला केवळ २९०० लसीचा डोस प्राप्त झाला. यामुळे लसीकरणाचा कोटा पूर्ण होणार तरी कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लसीच्या तुटवड्यामुळे सरकारने १८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण सध्या थांबवले असून, ४५ वर्षांवरील लोकांचा दुसरा डोस पूर्ण करण्यावर जास्त भर दिला जात आहे; परंतु दुसऱ्या डोससाठी नागरिकांची भटकंती अजूनही सुरूच आहे. अनेक जण दररोज लसीकरण केंद्रावर जाऊन परत येत आहेत.
नागपूर जिल्ह्याला शनिवारी २९०० डोसेज प्राप्त झालीत. नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कमी प्रमाणात मिळालेल्या कोव्हॅक्सिन या लसीचे हे डोस आहेत. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वापर कोव्हिशिल्ड या लसीचा झाला आहे. त्यामुळे या प्राप्त झालेल्या २९०० डोसेसमधून ४५ वर्षांवरील
ज्या नागरिकांनी यापूर्वी कोव्हॅक्सिन घेतली आहे, त्यांनाच दुसरा डोस म्हणून उपयोगी पडणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात दोन हजार व ग्रामीण भागात ९०० असा वाटप या लसीचा करण्यात आला आहे.
१८१ मेट्रिक टन ऑक्सिजन
शनिवारी नागपूरला एकूण १८१ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाला आहे त्यापैकी ११० मेट्रिक टन ऑक्सिजनचे वितरण खासगी व शासकीय रुग्णालय व प्लांटला करण्यात आले आहे.
१६५४ रेमडेसिविर :
नागपूर जिल्ह्याला शनिवारी १६५४ रेमडेसिविर इंजेक्शन प्राप्त झाले आहेत. मागणीनुसार पुरवठा केला जात आहे .