नागपूर/अमरावती : विदर्भाच्या मातीला पुन्हा एकदा अभिमानाचा क्षण मिळाला आहे. अमरावतीचे सुपुत्र आणि विदर्भातील न्याय व सामाजिक न्याय यासाठी झटणाऱ्या कुटुंबात जन्मलेले न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई १४ मे २०२५ रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. हा क्षण केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण विदर्भासाठी गौरवाचा आहे.
गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे झाला. त्यांचे वडील आर.एस. गवई हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख नेते, माजी खासदार आणि राज्यपाल होते. गवई कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित आहे आणि त्यांची सामाजिक समतेसाठी सतत चळवळ राहिली आहे.
१९८५ मध्ये बी.आर. गवई यांनी वकिली करण्यास सुरवात केली. त्यांनी सुरुवातीला राजा एस. भोसले यांच्यासोबत काम केले. १९८७ ते १९९० या काळात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली केली आणि नंतर नागपूर खंडपीठात काम केले.
विदर्भात वाढलेला, देशात पोहोचलेला!गवई यांची कारकीर्द ही विदर्भातून उगम पावून देशाच्या सर्वोच्च न्यायिक पदापर्यंत पोहोचलेली आहे. ते सध्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती असून, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर त्यांची नियुक्ती निश्चित झाली आहे.
न्यायालयीन पारदर्शकतेचा नवा आदर्शशपथपूर्व त्यांनी स्वतःची मालमत्ता जाहीर करत न्यायव्यवस्थेतील पारदर्शकतेच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललं आहे. अमरावती, नागपूर, मुंबई आणि दिल्लीतील स्थावर मालमत्ता, शेअर्स, पीपीएफ, बँक ठेव, आणि दागिन्यांची माहिती त्यांनी सार्वजनिक केली आहे.
मालमत्तेचा तपशीलस्थावर मालमत्ता
- अमरावतीतील वडिलांकडून वारसाहक्काने मिळालेले घर आणि शेती जमीन
- वांद्रे (मुंबई) आणि डिफेन्स कॉलनी (दिल्ली) येथे स्वतःच्या अपार्टमेंट्स
- केदापूर व काटोल (नागपूर) येथे स्वतःची शेती जमीन
शेअर्स/निवेश
- न्याय सागर को-ऑप सोसायटीमध्ये रु. १००० चे शेअर्स
- पीपीएफ – रु. ६,५९,६९२
- जीपीएफ – रु. ३५,८६,७३६
- इतर गुंतवणूक – रु. ३१,३१५
- पत्नीचे पीपीएफ – रु. ६,५९,६९२
जंगम मालमत्ता
- दागिने (सोनं व इतर) – रु. ५,२५,८५९
- रोख रक्कम – रु. ६१,३२०
- बँक शिल्लक – रु. १९,६३,५८४
- इतर आगाऊ रक्कम – रु. ५४,८६,८४१
- पत्नीचे स्त्रीधन (७५० ग्रॅम दागिने) – रु. २९,७०,०००
दायित्वे
- मुंबईतील फ्लॅटसाठी सुरक्षा ठेव – रु. ७,००,०००
- दिल्लीतील भाड्याचे आगाऊ भाडे – रु. १७,३२,५००
- ‘भूषण गवई HUF’ अंतर्गत दायित्व – रु. १,०७,५०,८३७
ही मालमत्ता घोषणा केवळ पारदर्शकतेचे प्रतीक नसून, न्यायपालिकेतील नव्या युगाची सुरुवातही ठरते.