शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

विदर्भातील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीत जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:33 PM

चार महिन्यात कोरडा व ओल्या दुष्काळाला तोंड देणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांनी ‘आता आम्ही जगायचे कसे,’ असा प्रश्न प्रशासनाला विचारला आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षणाला अद्यापही सुरुवात नाहीआदिवासीबहुल भागातील शेतकरी संकटात

कैलास निघोट।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेक तालुक्यातील देवलापार या आदिवासीबहुल भागात यावर्षी सुरुवातीला अत्यल्प पाऊस कोसळल्याने धानाची रोवणी झाली नाही. मध्यंतरी संततधार आणि कापणीच्यावेळी परतीच्या पावसाचे आगमन झाल्याने होती नव्हती ती पिके खराब झाल्याने हातची गेली. या नुकसानीच्या सर्वेक्षण व पंचनाम्यांना अद्यापही सुरुवात करण्यात आली नाही. चार महिन्यात कोरडा व ओल्या दुष्काळाला तोंड देणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांनी ‘आता आम्ही जगायचे कसे,’ असा प्रश्न प्रशासनाला विचारला आहे.या भागात धानाचे सर्वाधिक पीक घेतले जात असून, येथे कोणत्याही प्रकारची सिंचनाची साधने नसल्याने शेतकऱ्यांना केवळ पावसाच्या पाण्यावर शेती करावी लागते. यावर्षी सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने तसेच तुरळक सरी कोसळल्याने या भागातील ७२ गावांमध्ये धानाची रोवणी होऊ शकली नाही. खरं तर, या ७२ गावांमध्ये आधीच कोरडा दुष्काळ जाहीर करायला हवा होता. या परिसरात केवळ नऊ टक्के क्षेत्रात रोवणी झाली असताना त्याची शासनदरबारी नोंद घेण्यात आली नाही.विहिरी, मोटरपंप व कालवे आदी सिंचनाची हक्काची साधने नसल्याने या भागातील शेतकऱ्यांना इच्छा असूनही रबीची पिके मोठ्या प्रमाणात घेता येत नाही.वारंवार मागणी करूनही आजवरच्या लोकप्रतिनिधींनी या मूलभूत सुविधांच्या निर्मितीकडे लक्ष न देता आदिवासीबांधवांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याचे केवळ मतांच्या राजकारणासाठी वापर केला.पावसाअभावी या भागात केवळ ९ ते १० टक्के क्षेत्रात रोवणी झाल्याची नोंद कृषी व महसूल विभागाने केली आहे. तसा अहवालही अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठविल्याचे सांगितले. रोवणी करण्यात आलेल्या शेतांमधील धान प्रतिकूल वातावरण व ऐनवेळी पाणी न मिळाल्याने पक्व झाला नाही. त्यामुळे धानाचे उत्पादन घटले.पर्यायी पीक म्हणून अनेकांनी कपाशी व तुरीची लागवड केली. मात्र, परतीच्या पावसाने तीही पिके नष्ट झाली. याबाबी या भागातील लोकप्रतिनिधी व जिल्हा मुख्यालयातील अधिकाऱ्यांना माहिती असूनही आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे औदार्य कुणी दाखविले नाही.

मागील वर्षीच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षामागील वर्षी या भागात कोरडा दुष्काळ पडला होता. कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी ‘लोकमत’मध्ये वेळावेळी वृत्तही प्रकाशित करण्यात आले. त्या वृत्तांची दखल घेत शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई जाहीर केली. याला वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, या काळात शासनाने या भागातील नुकसानग्रस्त ५९ गावांमधील एकाही शेतकऱ्याला कवडीचीही मदत केली नाही. ही नुकसानभरपाई मिळणार कधी, असा प्रश्नही येथील शेतकऱ्यांनी केला आहे.

‘ती’ १२ गावे दुर्लक्षितमहसूल विभागाच्या देवलापार मंडळाला लागून मुसेवाडी मंडळ आहे. देवलापारलगतच्या मुसेवाडी मंडळातील खरपडा, सावंगी, सवंदनी, मानेगाव (कला), वरघाट, तुमडीटोला, हिवराबाजार, टांगला, सालई, घोटी, रमजान व चिकणापूर ही दुष्काळग्रस्त गावांच्या यादीतून वगळण्यात आली होती. ही बाब वेळीच प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे ही गावे दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समाविष्ट केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. परंतु, ही गावे अद्यापही त्या यादीत समाविष्ट करण्यात न आल्याने ती दुर्लक्षित राहिली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी