शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅकलिस्टेड 'कोएम्प्ट एज्यु' कंपनीला नागपूर विद्यापीठाने परीक्षांचे काम दिले कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:07 IST

Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांचे काम ब्लॅकलिस्टेड असलेल्या 'कोएम्प्ट एज्यु, टेक प्रा. लिमिटेड' या कंपनीला कसे दिले, असा सवाल भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेने (एनएसयूआय) केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांचे काम ब्लॅकलिस्टेड असलेल्या 'कोएम्प्ट एज्यु, टेक प्रा. लिमिटेड' या कंपनीला कसे दिले, असा सवाल भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेने (एनएसयूआय) केला आहे. विभागाशी संबंधित टेंडर प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप 'एनएसयूआय'ने केला आहे. कुलगुरूंनी यावर समिती स्थापन करून टेंडरची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.

एनएसयूआयच्या शिष्टमंडळाने मंगळवारी कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप केले. आगामी तीन वर्षासाठी कोएम्प्ट कंपनीसोबत करण्यात आलेला करार नियमबाह्य असल्याचे निदर्शनास आणून दिले. कंपनीने सादर केलेले अनुभव प्रमाणपत्र, आवश्यक कागदपत्रे व पूर्वीचा कामकाजाचा नोंदवही यांची योग्य तपासणी करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या कोएम्प्ट या नावाने कार्यरत असलेली ग्लोबरेना टेक्नॉलॉजीज प्रा. लि. विविध विद्यापीठांमध्ये ब्लॅकलिस्ट करण्यात आल्याचे प्रकरणे समोर आल्याचेही संघटनेचे नमूद केले.

टेंडर प्रक्रियेदरम्यान नियमांमध्ये असामान्य बदल केल्याने अनेक पात्र कंपन्या प्रक्रियेतून बाहेर पडल्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताशी तडजोड झाल्याचा आरोप एनएसयूआयने केला. या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. क्षीरसागर, एनएसयूआयचे पदाधिकारी तसेच वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल यांच्यात बैठक झाली. संघटनेने सदर कंपनीसोबतचा एमओयू रद्द करून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. कुलगुरू डॉ. क्षीरसागर यांनी उच्चस्तरीय समिती गठित करून निष्पक्ष चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी संघटनेतर्फे अजित सिंह, आशिष मंडपे, प्रणय सिंह ठाकूर, विद्यासागर त्रिपाठी, सुमित पाठक, आयुष गोरले आदी उपस्थित होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur University Faces Questions Over Blacklisted Company's Exam Contract.

Web Summary : NSUI questions Nagpur University for awarding exam work to blacklisted Koempt Edu. They allege irregularities in the tender process and demand an inquiry, citing compromised student interests. The Vice-Chancellor has assured a high-level committee investigation.
टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूरEducationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थी