शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

कसे राहणार ‘स्वच्छ नागपूर’ ? नवीन मनपा आयुक्तांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 1:03 AM

‘स्मार्ट सिटी’ योजनेत पिछाडीवर असलेल्या नागपूर शहराची ‘क्लीन सिटी’ म्हणून असलेली ओळखदेखील मिटण्याचे संकट उभे ठाकले आहे. नागपूर महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे शहरवासीयांचा अपेक्षाभंग होत आहे. केंद्र सरकारद्वारा सर्व शहरांतील नागरिकांचा स्वच्छतेत सहभाग वाढविण्यासाठी स्वच्छता ‘अ‍ॅप’ बनविण्यात आले आहे. या ‘अ‍ॅप’ला ‘डाऊनलोड’ करुन या माध्यमातून आपल्या परिसरातील अस्वच्छतेची माहिती मनपाला पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सोबतच एखादी तक्रार आली तर त्याचे समाधान करण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. २०१७ साली ५० हजारांहून अधिक नागपूरकरांनी हे ‘अ‍ॅप’ डाऊनलोड केले होते. मात्र असे होत नसल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी हे ‘अ‍ॅप’ वापरणे कमी केले. आता शहराला ‘स्वच्छ’ ठरविणाऱ्या ‘रॅकिंग’मध्ये याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देनागरिकांचा अपेक्षाभंग : स्वच्छता मोहीम व्यापकपणे राबविण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘स्मार्ट सिटी’ योजनेत पिछाडीवर असलेल्या नागपूर शहराची ‘क्लीन सिटी’ म्हणून असलेली ओळखदेखील मिटण्याचे संकट उभे ठाकले आहे. नागपूर महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे शहरवासीयांचा अपेक्षाभंग होत आहे. केंद्र सरकारद्वारा सर्व शहरांतील नागरिकांचा स्वच्छतेत सहभाग वाढविण्यासाठी स्वच्छता ‘अ‍ॅप’ बनविण्यात आले आहे. या ‘अ‍ॅप’ला ‘डाऊनलोड’ करुन या माध्यमातून आपल्या परिसरातील अस्वच्छतेची माहिती मनपाला पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सोबतच एखादी तक्रार आली तर त्याचे समाधान करण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. २०१७ साली ५० हजारांहून अधिक नागपूरकरांनी हे ‘अ‍ॅप’ डाऊनलोड केले होते. मात्र असे होत नसल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी हे ‘अ‍ॅप’ वापरणे कमी केले. आता शहराला ‘स्वच्छ’ ठरविणाऱ्या ‘रॅकिंग’मध्ये याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.दर महिन्याला बनत आहे अहवालसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये केंद्राकडून स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येईल. याची तयारी वर्षभरापासून सुरू आहे. याचा दर महिन्याला अहवाल बनविण्यात येतो. पुढील मार्चपर्यंत जो अहवाल बनेल त्याच्या आधारावर शहरांचे ‘रॅकिंग’ निश्चित करण्यात येईल. मात्र या ‘अ‍ॅप’पासून नागरिकांचा अपेक्षाभंग झाल्याने अंतिम ‘रँकिंग’मध्ये नागपूर माघारण्याची शक्यता आहे.आयुक्तांसाठी मोठे आव्हानबुधवारी मनपाचे नवीन आयुक्त अभिजित बांगर यांनी पदभार सांभाळला आहे. याअगोदरचे आयुक्त वीरेंद्र सिंह आपल्या कार्यकाळात शहराचे ‘रँकिंग’ सुधारण्यासाठी खास करू शकले नाही. अशात नागपूरची ‘क्लीन सिटी’ ही ओळख बनवून ठेवण्यासाठी आपल्या चमूकडून काम करवून घेणे व सोबतच शहरातील नागरिकांचा परत विश्वास जिंकण्याचे आव्हान बांगर यांच्यासमोर आहे.प्रशासनाच्या सुस्तीमुळे नागरिकांची निराशास्वच्छता सर्वेक्षणाअंतर्गत २०१६ मध्ये ‘लॉंच’ करण्यात आलेल्या स्वच्छता ‘अ‍ॅप’कडे या वर्षी नागरिकांचा ओढा कमी का झाला याची ‘लोकमत’ने चाचपणी केली. मनपा प्रशासनाने २०१६ व २०१७ मध्ये हे ‘अ‍ॅप’ डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी जी ताकद लावली, ती तक्रारींचे निवारण करण्यासाठी लावलेली नाही. या वर्षी प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. मात्र येत्या काळात प्रणाली सुधारेल असा दावा मनपा अधिकारी करत आहेत.मूल पहिल्या क्रमांकावरस्वच्छता ‘अ‍ॅप’ डाऊनलोड करणाऱ्याच्या बाबतीत विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहर पहिल्या क्रमांकावर आहे. २५ हजार ४४९ लोकसंख्या असलेल्या या शहरात आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी व त्यांचे प्रशासनाकडून झालेले निराकरण या बाबी १०० टक्के आहेत.कुठे आहे नागपूर ?स्वच्छता ‘अ‍ॅप’ डाऊनलोड करणे व मनपाकडून तक्रारींचे समाधान करणे याबाबतीत नागपूर शहर ५१६ व्या क्रमांकावर आहे. या सर्वेक्षणात एकूण पाच हजार शहरांचा समावेश करण्यात आला आहे. ५१६ व्या स्थानी नागपूरसोबतच राजस्थानमधील गंगापूर व महाराष्ट्रातील श्रीगोंदा ही शहरे आहेत. शहराला आॅक्टोबर मध्ये १७ टक्के तर नोव्हेंबरमध्ये १८ टक्केच गुण मिळू शकले. मागील तीन महिन्यात या ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून लोकांनी अस्वच्छतेचे फोटो अपलोड करुन तक्रारी तर केल्या. मात्र मनपा प्रशासनाने यातील केवळ १३१ तक्रारींचेच समाधान केले. सप्टेंबरमध्ये १७० तक्रारी प्राप्त झाल्या व यातील ४७ सोडविल्या गेल्या. आॅक्टोबरमध्ये १६० पैकी केवळ १६ तर नोव्हेंबर महिन्यात १६१ पैकी ६८ तक्रारी सोडविल्या गेल्या.कशी होईल सुधारणा

  • जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छता ‘अ‍ॅप’ डाऊनलोड केले, तर शहराचे ‘रँकिंग’ सुधारेल.
  • जास्त प्रमाणात नागरिकांनी अस्वच्छतेचे फोटो अपलोड करुन तक्रार केली तर ‘रॅकिंग’ सुधारेल
  • तक्रारींची दखल घेऊन वेगाने त्यांचे निवारण झाले तर शहराचे ‘रँकिंग’ सुधारेल.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाAbhijit Bangarअभिजित बांगर