शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

एकाच घरात २०० पेक्षा अधिक मतदार कसे ? नगरपालिकांच्या निवडणुकीआधी मतदार यादीत गोंधळाचा स्फोट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 16:21 IST

Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांकडून व राजकीय पक्षांकडून या मतदार यादीची तपासणी केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत. अशात हिंगणा विधानसभा मतदारसंघातील वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीत घोळ असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये एकाच घरात तब्बल २०० पेक्षा जास्त मतदार आढळून आल्याचे दिसून येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांकडून व राजकीय पक्षांकडून या मतदार यादीची तपासणी केली जात आहे. या तपासणीत वानाडोंगरी शहरातील राजीव नगर (सरोदीपुरा) प्रभाग क्रमांक ५ मध्ये एकाच घर क्रमांक १ वर तब्बल २०० पेक्षा जास्त मतदार राहात असल्याचे दाखविण्यात आले आहे. यासोबतच एकाच आडनावाचे तब्बल २७ सदस्य सुद्धा एकाच घरात राहात असल्याचे यादीत आढळल्याचे सांगितले जाते. राजीव नगरच नव्हे, तर हिंगणा विधानसभा क्षेत्रातील नगर परिषद बुटीबोरी, वाडी, वानाडोंगरी, डिगडोह (देवी), नीलडोह, हिंगणा, गोधनी रेल्वे आदी भागातही असेच प्रकार आढळून आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

बेसा पिपळा : केवळ मतदारांचे नाव, घर क्रमांक व पत्ता नाहीच 

बेसा पिपळा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ मधील यादी भाग क्रमांक ३९२-१ मध्ये बेसा बेलतरोडी, पिपळा व घोगली येथील मतदारांची नावे आहेत. यामध्ये केवळ मतदारांचीच नावे आली आहेत. त्यांचे छायाचित्र, घर क्रमांक आणि रहिवासी पत्ता दिलेला नाही. तेव्हा मतदारांना जर काही आक्षेप घ्यायचाच असेल तर तो कसा घेणार? संबंधित नाव हे त्याच मतदाराचे आहे हे कसे समजणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

"राज्य निवडणूक आयोगाने व जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करून घरोघरी तपासणी मोहीम राबवावी आणि बोगस मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही करावी."- दिनेश बंग, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते

"निवडणूक आयोग यांच्याद्वारे प्राप्त झालेली ही मतदार यादी आहे. ती नगरपालिकेद्वारे विविध वॉर्डात विभाजित केली जाते. सदर घर क्रमांक हे मालमत्ता क्रमांक नाहीत. ही मतदार यादी तयार करण्याचे काम नगरपालिका करत नाही. नगरपालिका केवळ आयोगाद्वारे प्राप्त झालेल्या मतदार यादीचे वॉर्डनुसार विभाजन करते."- राहुल परिहार, मुख्याधिकारी, वानाडोंगरी नगर परिषद

English
हिंदी सारांश
Web Title : Voter list irregularities: 200+ voters in one house before election!

Web Summary : Wanadongri voter list reveals discrepancies, with 200+ voters at one address. Similar issues plague Hingna area councils. Besa Pipla list lacks crucial details. Calls for investigation, deletion of bogus voters.
टॅग्स :nagpurनागपूरZP Electionजिल्हा परिषदElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग