आयकर भरूनही नोटीस कशी?; पंचायत समितीचा घोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:04 IST2025-06-12T15:03:47+5:302025-06-12T15:04:44+5:30

Nagpur : भरलेले ५६ हजार कुठे गेले?

How can I get a notice even after paying income tax?; Panchayat Samiti's confusion | आयकर भरूनही नोटीस कशी?; पंचायत समितीचा घोळ

How can I get a notice even after paying income tax?; Panchayat Samiti's confusion

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
पंचायत समिती नागपूर ग्रामीणमध्ये आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कार्यरत असलेल्या समूह साधन केंद्र वाडीचे केंद्रप्रमुख शरद भांडारकर यांनी त्याच्या उत्पन्नावर आकारण्यात आलेला आयकर ५६ हजार ६२ रुपये रोखीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे जमा केले होते. मात्र, त्यानंतरही त्यांना आयकर विभागाकडून नोटीस आल्याने जमा केलेली रक्कम कुठे गेली असा प्रश्न निर्माण झाला आहे.


जमा केलेल्या रकमेचा भांडारकर यांनी शोध घेतला असता ही रक्कम त्यांच्या पॅनखात्यावर जमा न करता, पंचायत समितीने ही रक्कम २०१९-२० च्या जुन्या कर आकारणीतील विलंब शुल्क आणि व्याज भरण्यासाठी वापरल्याचे निदर्शनास आले. सेवाकाळात नियमाने कर भरूनही ही नोटीस मिळाल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती भांडारकर यांनी दिली.


घोळ उघड झाला, पण उत्तरदायित्वाचे काय?
विषयाची माहिती अधिकारातून विचारणा करूनही कोणताही स्पष्ट खुलासा मिळाला नाही. मात्र, काटोल येथील आयकर सल्लागार प्रवीण भैस्वार यांच्या सहकार्याने हा आर्थिक घोल उघड झाला पंचायत समिती नागपूर ग्रामीण कार्यालयाने भरलेली रक्कम चुकीच्या आर्थिक वर्षात आणि चुकीच्या कारणासाठी वापरली गेल्याने ती भांडारकर यांच्या पॅन खात्यावर जमा झाली नाही. 


न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच !
भांडारकर यांनी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती नागपूर यांना ई-मेलद्वारे तक्रार दाखल करून विहित मुदतीत दुरुस्ती करून रक्कम त्यांच्या पॅन खात्यावर जमा करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर ही तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आयकर विभागाकडे केली आहे. न्याय न मिळाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

Web Title: How can I get a notice even after paying income tax?; Panchayat Samiti's confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.