घर देता का घर
By Admin | Updated: December 8, 2015 04:01 IST2015-12-08T04:01:52+5:302015-12-08T04:01:52+5:30
मुंबईनंतर सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात सर्वात संवेदनशील शहर म्हणून नागपूरचे नाव घेतले जाते. राष्ट्रीय घडामोडींचे केंद्रस्थान

घर देता का घर
पोलीसदादा हक्काच्या निवाऱ्याविना : दोन हजार परिवारांची कुचंबणा
नरेश डोंगरे ल्ल नागपूर
मुंबईनंतर सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात सर्वात संवेदनशील शहर म्हणून नागपूरचे नाव घेतले जाते. राष्ट्रीय घडामोडींचे केंद्रस्थान म्हणून ओळखले जाणारे संघ मुख्यालय, देश-विदेशातील बौद्ध बांधवांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली दीक्षाभूमी, न्यायमंदिर ही आणि अशीच अनेक महत्त्वपूर्ण स्थळे नागपुरात आहेत. अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तीही येथे राहतात. त्यामुळे येथील महत्त्वपूर्ण स्थळांवर सीआयसीएफसारखी अत्युच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. परंतु कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि उपराजधानीत कोणतीही घातपाताची घटना घडू नये यासाठी खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासनालाच परिश्रम घ्यावे लागते. त्याचमुळे घातपातासारखी कोणतीही मोठी घटना घडू नये म्हणून रात्रंदिवस रस्त्यारस्त्यावर ‘पोलीसदादा’ धडपडताना दिसतो. ऊन, वारा, पावसात तो २४ तास आॅनड्युटी असतो.
अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या मूलभूत सुविधा सर्वांनाच मिळाव्यात, असा आग्रह असताना समाजाच्या जानमालाची सुरक्षा सांभाळणाऱ्या ‘पोलीसदादा’च्या कुटुंबीयांची निवाऱ्यासाठी परवड होत असल्याचे उपराजधानीतील वास्तव आहे. ३० ते ३५ लाख लोकसंख्येच्या उपराजधानीच्या सुरक्षेची जबाबदारी ७,३९९ पोलीस कर्मचारी सांभाळतात. सरकारी नियमानुसार प्रत्येकाला शासकीय निवासस्थान मिळावे, अशी अपेक्षा आहे. मात्र, उपराजधानीत पोलिसांची केवळ २८७४ निवासस्थानेच आहेत. त्यातील २०० पेक्षा जास्त निवासस्थाने कंडम (अतिजीर्ण) आहेत. त्यात १३२ निवासस्थाने ‘राखीव’ ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे उपराजधानीतील ७,३९९ पैकी २५२४ कर्मचाऱ्यांच्या परिवारांनाच हक्काचे (शासकीय) निवासस्थान मिळालेले आहे.
शहरात सर्वात मोठी पोलिसांची वसाहत पोलीस मुख्यालयाजवळ (पोलीस लाईन टाकळी) आहे. येथे १६४६ पोलीस कर्मचाऱ्यांची चांगली निवासस्थाने आहेत. मात्र इतर बहुतांश ठिकाणी असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानांची अवस्था फारच वाईट आहे. ३०-४० वर्षे जुनाट आणि कोंदट, १० बाय १० च्या दोन खोल्यात पोलिसांचे परिवार दिवस काढत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सीताबर्डी, धंतोली, सोनेगाव परिसरातील पोलिसांच्या वसाहतीभोवती घाणीचे साम्राज्य आहे. इमारतींच्या मागच्या-पुढच्या भागात प्रचंड घाण साचली आहे.
४एकूण निवासस्थाने - २८७४
४जीर्ण निवासस्थाने - २२०
४विविध कारणांमुळे रिक्त - १३२
४उपराजधानीत कार्यरत पोलीस कर्मचारी - ७३९९
४सध्या निवासस्थानात राहात असलेले परिवार - २५२४
४प्रतीक्षा यादीत - २५६ परिवार
४निवासाच्या प्रतीक्षेतील परिवार किमान - २००० (अंदाजे)
पोलीस स्टेशननिहाय
कर्मचाऱ्यांची निवासस्थाने
हुडकेश्वर - २४८
सीताबर्डी - १३१
धंतोली - ०२६
इमामवाडा - ०५१
गिट्टीखदान - ०१४
एमआयडीसी- ०२८
सदर- ०५५
सक्करदरा - ०४८
लकडगंज - ०८५
नियंत्रण कक्ष - ०३०
पाचपावली - २११
तहसील - १५३
सोनेगाव - ०१८
अजनी -०८२
गणेशपेठ - ०५३
मुख्यालय - १६४६