नागपुरातील सतरंजीपुरा ठरले हॉटस्पॉट, सील क्षेत्रात पुन्हा वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 09:16 PM2020-04-14T21:16:33+5:302020-04-14T21:52:46+5:30

: सतरंजीपुरा परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवार-शनिवारी सतरंजीपुरा व मोमिनपुरा परिसराच्या प्रतिबंधित क्षेत्रात मनपाने वाढ केली. रविवारी पुन्हा या दोन परिसराचा आणखी काही भाग प्रतिबंधित करण्यात आला.

Hotspots become Satranjipura in Nagpur, re-growth in seal area | नागपुरातील सतरंजीपुरा ठरले हॉटस्पॉट, सील क्षेत्रात पुन्हा वाढ

नागपुरातील सतरंजीपुरा ठरले हॉटस्पॉट, सील क्षेत्रात पुन्हा वाढ

Next
ठळक मुद्देमनपा आयुक्तांचे आदेश : कोरोना बाधितांची संख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सतरंजीपुरा परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवार-शनिवारी सतरंजीपुरा व मोमिनपुरा परिसराच्या प्रतिबंधित क्षेत्रात मनपाने वाढ केली. रविवारी पुन्हा या दोन परिसराचा आणखी काही भाग प्रतिबंधित करण्यात आला. सोमवारी आसीनगर व गांधीबाग झोनमधील प्रभाग क्र. ३ व ७ चा मोठा भाग ‘कंटेन्मेंट झोन’म्हणून जाहीर करण्यात आला. मंगळवारी पुन्हा सतरंजीपुरा झोनच्या प्रभाग २१ मधील दललापुरा भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. याचा परिणाम शहराच्या इतर भागावर होऊ नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात वाढ करण्यात आली. यात प्रामुख्याने प्रभाग २१ मधील परिसराचा समावेश आहे. याबाबतचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
असा आहे सील केलेला परिसर
दक्षिण पश्चिम : मस्कासाथ चौक-उत्तर पश्चिमेस : चकना चौक-उत्तर पूर्वेस : महाजन किराणा-पूर्वेस : शिवशक्ती एनक्लेव्ह-दक्षिण पूर्वेस : दहीबाजार पूल-दक्षिणेस : रोकडे बिल्डिंग.

सोमवारी सील करण्यात आलेले क्षेत्र
उत्तर पश्चिमेस : इटारसी चौक-उत्तरेस : पिवळी नदी, वनदेवीनगर-पूर्वेस : कळमना रेल्वे गेट क्र. १, कोराडी लाईन-दक्षिण पश्चिम : कावरापेठ, शांतिनगर रेल्वेगेट-पश्चिमेस : कांजीहाऊस चौक.

आधी घोषित केलेले प्रतिबंधित क्षेत्र
प्रभाग क्र. २१ व २२ मधील भाग-उत्तर पूर्वेस : ए.एम.ए. कंपनी मालधक्का रोड-दक्षिण पूर्वेस : उमियाशंकर शाळा-दक्षिण पश्चिमेस : मासूरकर चौक, बैरागीपुराकडे जाणारा मार्ग-उत्तर पश्चिमेस : हॉटेल मदिना-पूर्वेस : बोधिसत्व बौद्धविहार.

दोन आठवडे ‘कंटेन्मेंट झोन’
कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला परिसर वा तेथील संक्रमणाची संख्या वाढत असेल तर अशा परिसराला ‘कंटेन्मेंट झोन’ म्हणून जाहीर करण्यात येते. अशा परिसरावर संपूर्ण सरकारी यंत्रणांचा ताबा असतो. तेथील दैनंदिन व्यवहारावर मर्यादा येतात. दोन आठवडे म्हणजे १४ दिवस हा परिसर आरोग्याच्या देखरेखीत असतो.

Web Title: Hotspots become Satranjipura in Nagpur, re-growth in seal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.