लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर आणि त्याची अंमलबजावणी केल्यानंतर, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून दुसऱ्या टप्प्यावर भर देण्यात येत आहे. तर दुसरीकडे महामेट्रोच्या जमिनींवर हॉटेल्स, रुग्णालये, निवासी आणि व्यावसायिक इमारतींचे बांधकाम होणार आहे.
सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत राबविण्यात येणारे हे तीन मोठे प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण होतील अशी माहिती महामेट्रोमधील सूत्रांनी दिली आहे. या प्रकल्पांमध्ये अंदाजे १६०० कोटींची गुंतवणूक होण्याची अपेक्षा असून ३,००० हून अधिक लोकांना रोजगार मिळेल.
यासंदर्भात, अॅडव्हांटेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवात महामेट्रोने नागपुरात 'लँड मॉनिटायझेशन' अंतर्गत केअर ग्रुपला साडेतीनशेहून अधिक खाटा असलेले अत्याधुनिक रुग्णालय स्थापन करण्यासाठी 'लेटर ऑफ इन्टेंट' जारी केले आहे. यानुसार केअर ग्रुप कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनला लागून असलेल्या महामेट्रोच्या जमिनीवर ६०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह अत्याधुनिक रुग्णालय बांधेल.
त्याचप्रमाणे, सीताबर्डी येथील यशवंत स्टेडियमसमोरील महामेट्रोच्या जमिनीवर पीपीपी आधारावर हॉस्पिटॅलिटी, निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पाच्या विकासासाठी 'एलओए' जारी करण्यात आला आहे. या प्रकल्पात ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक असेल. वर्धा रोडवरील एअरपोर्ट मेट्रो स्टेशनच्या मागे महामेट्रोच्या जमिनीवर हॉस्पिटॅलिटी सेंटरसाठी हिल्टनसोबत एक सामंजस्य करारदेखील करण्यात आला आहे. हा प्रकल्प २०० कोटी रुपयांचा आहे. परिणामी, तिन्ही प्रकल्पांमध्ये १२ लाख चौरस फूट बांधकाम केले जाईल. महामेट्रोमधील अधिकृत सूत्रांनी पुढील तीन ते चार वर्षात हे प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा केली आहे. भविष्यात पीपीपी मॉडेलअंतर्गत असे आणखी मोठे प्रकल्प राबविले जाण्याची अपेक्षा आहे.
Web Summary : Nagpur Metro land will soon feature hotels, hospitals, and commercial buildings under a PPP model. Projects worth ₹1600 crore are expected, generating over 3,000 jobs. Care Group will establish a hospital, while hospitality projects are planned with Hilton, completing in 3-4 years.
Web Summary : नागपुर मेट्रो की जमीन पर पीपीपी मॉडल के तहत होटल, अस्पताल और व्यावसायिक इमारतें बनेंगी। ₹1600 करोड़ के प्रोजेक्ट से 3,000 से अधिक नौकरियाँ मिलेंगी। केयर ग्रुप अस्पताल बनाएगा, हिल्टन के साथ होटल प्रोजेक्ट 3-4 साल में पूरे होंगे।