महिला दिनानिमित्त गांधीसागर येथे महिला सफाई कामगारांचा गौरव

By गणेश हुड | Published: March 8, 2024 05:04 PM2024-03-08T17:04:32+5:302024-03-08T17:05:44+5:30

नागपूर  : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्था, योगा नृत्य गणेशपेठ ग्रुप, व परफेक्ट योगा  यांच्या ...

Honoring women sweepers at Gandhisagar on the occasion of Women's Day | महिला दिनानिमित्त गांधीसागर येथे महिला सफाई कामगारांचा गौरव

महिला दिनानिमित्त गांधीसागर येथे महिला सफाई कामगारांचा गौरव

नागपूर  : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्था, योगा नृत्य गणेशपेठ ग्रुप, व परफेक्ट योगा  यांच्या वतीने गांधीसागर हुतात्मा स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते  महिला सफाई कामगारांचा गौरव करण्यात आला.

प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेविका हर्षला साबळे, प्रेरणा कदम, मीना भुते, विद्याचव्हाण, माधुरी पुसदकर ,कविता जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते. प्रस्ताविक आणि संचालन संस्थेचे अध्यक्ष राजेश कुंभलकर यांनी केले. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला मल्यार्पण  करण्यात आले. याप्रसंगी  महानगरपालिका येथील स्वच्छता  विभागातील महिला स्वच्छता दूत  कौशल्य कोरी, निर्मला शगडा,  कुसुम पेरी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित महिलांचाही सत्कार करण्यात आला.

नंदू लेकुरवाळे यांनी आभार मानले. यावेळी रेखा दंतुलवार, प्रेरणा गावंडे, गौरी निंबाळकर,शाबू बालपांडे, रेखा सुपारे, मीना इंगळे ,सरिता खेडेकर, गायती पांडे , राजेश्री चौधरी,  नंदा देशमुख, रेखा मोदे, कांचन ईश्वरकर, माधुरी ठवकर,  रोशनी चौधरी, दर्शना राऊत ,गौरी निमकर , रंजना वानखेडे ,मीनाक्षी आगलावे ,यशस्वी हलमारे,वंदना काळे,पुष्पा धार्मिक,कविता गोजे,  कैलास तानकर,हेमंत बेर्हेरखेडे ,शंकरराव हेडाऊ, कृष्णकुमार पडवंशी, नीरज  तिळगुळे,पितांबर लुटे, प्रकाश मोतीवार, श्याम दंतुलवार,किशोर जयस्वाल, श्रीराम बांदरे,दीपक जयस्वाल, ॲड. संजय नारेकर, मनिष सालोडकर, मनिष मोरे,विलास देशकर , प़शांत चलपे, देवेन्द नेरकर, हरिष बोरकर, धमेंन्द बोरकर, अशोक शेंडे, राजु आष्टीकर,,विनोद गोडघाटे, जितेंन्द अतकरे आदी उपस्थित होते

Web Title: Honoring women sweepers at Gandhisagar on the occasion of Women's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.