लोकमततर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १८ महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2023 22:34 IST2023-03-08T22:28:20+5:302023-03-08T22:34:43+5:30
Nagpur News जागतिक महिला दिनानिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १८ महिलांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

लोकमततर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १८ महिलांचा सन्मान
नागपूर : जागतिक महिला दिनानिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १८ महिलांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
स्नेहांचल संस्थेच्या संचालिका डॉ. रोहिणी पाटील, ॲड. तेजस्विनी खाडे, ६ आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता डॉ. ऋचा जैन, हिलफाेर्ट पब्लिक स्कूलच्या संचालिका माजी नगरसेविका परिणिता फुके, दंत विभागाच्या संचालिका डाॅ. दमयंती आतराम, पाेद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य डाॅ. मीनी देशमुख, स्नेहा ट्यूशन क्लासेसच्या संचालिका स्नेहा बाेंद्रे, ट्रीट आइस्क्रीमच्या संचालिका मंजूषा चकनलवार, ऐेश्वर्या हाॅबी क्लासेसच्या संचालिका जया गुप्ता, निर्मिक ग्रामीण विकास व बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका जया अंबाेरे, रेकी मास्टर व वास्तू विशेषज्ञ डाॅ. दीपा नंदनवार, नागपूर जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या अध्यक्ष डाॅ. प्रीती मानमाेडे, श्रीमय ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका दीपाली तुमाने, नाे याेर टॅलेंट अकादमीच्या संचालिका डाॅ. रश्मी शुक्ला, एमसी वर्ल्ड ट्रॅव्हल्स ॲडव्हायझर प्रा. लि. च्या व्यवस्थापकीय संचालक धनश्री गंधारे, मिसेस इंडिया ग्लाेबल श्वेता माटे यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, लोकमत समाचारचे वरिष्ठ संपादक विकास मिश्र, लोकमतचे संपादक श्रीमंत माने उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते महिलांना स्मृतिचिन्ह व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. संचालन सखी मंचच्या सहायक व्यवस्थापक नेहा जोशी यांनी केले.