शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

होंडा ‘जाझ’चे थाटात उद्घाटन

By admin | Updated: July 9, 2015 02:53 IST

होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) या देशातील प्रीमियम कार बनविणाऱ्या कंपनीने नवीन थर्ड जनरेशन

रुषभ होंडामध्ये विक्रीस दाखल : इम्पेरिअर होंडामध्ये बुकिंग सुरूनागपूर : होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) या देशातील प्रीमियम कार बनविणाऱ्या कंपनीने नवीन थर्ड जनरेशन होंडा जाझ कार बुधवारी नागपुरात विक्रीसाठी दाखल केली. कंपनीचे अधिकृत विक्रेते अमरावती रोड येथील रुषभ होंडा आणि वर्धा रोड येथील इम्पेरिअर होंडा या दोन्ही शोरूममध्ये कारचे थाटात उद्घाटन करण्यात आले व ग्राहकांना कारची डिलेव्हरी देण्यात आली. उद्घाटनप्रसंगी रुषभ होंडामध्ये कंपनीचे क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक विपुल चौधरी, शोरूमचे महाव्यवस्थापक (विक्री) डेव्हिल एशिया, सेवा व्यवस्थापक नितीन खंडेराय आणि ग्राहक नितीन बलघट प्रामुख्याने उपस्थित होते. इम्पेरिअर होंडा येथे झालेल्या भव्य दाखलीकरण समारंभात कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक विपुल चौधरी, शोरूमचे महाव्यवस्थापक अमरदीप सिंग, व्यवस्थापक (मार्केटिंग) रत्नाकर मुळीक आणि ग्राहक सुरेश वाजा उपस्थित हजर होते. दोन्ही शोरूममध्ये बुकिंग व टेस्ट ड्राईव्ह सुरू आहे. पत्रपरिषदेत चौधरी म्हणाले, नवीन जाझला जगातील बेस्ट कार्यकुशल कॉम्पॅक्ट हॅचबॅकच्या रूपात विकसित केले आहे. डायनामिक स्टायलिंग, उत्कृष्ट पॅकेज, श्रेणीतील उत्तम इंधन क्षमता, प्रगत तंत्रज्ञान व उपकरण तसेच बहुउपयोगिता यात सादर करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायात उपलब्ध आहे. भारतीय बाजारपेठेसाठी १.५ लिटर आय-डीटीसी डिझेल इंजिन विकसित करण्यात आले असून आपल्या श्रेणीत २७.३ कि़मी. प्रति लिटर मायलेज देते. जाझ हे जागतिक पातळीवर सर्वांच्या पसंतीला उतरलेले यशस्वी मॉडेल आहे. २००१ साली फर्स्ट जनरेशनच्या लाँचिंगनंतर ७५ देशांत ५५ लाख गाड्या विकल्या गेल्या. गाडीत टच स्क्रीन आॅडिओ सिस्टीम, टच स्क्रीन नेव्हिगेशन, टच स्क्रीन एसी कंट्रोल, रिअर कॅमेरा अशा अत्याधुनिक यंत्रणा आहेत. ड्राईव्हिंग सीटवरदेखील अनेक फिचर्स व आकर्षक स्टेअरिंग दिले आहे. स्पीडोमीटरमध्ये इको असिस्ट सिस्टीम असून ते ड्रायव्हिंग स्टाईलनुसार रंग बदलते. इंटिरियर पाहता क्षणीच डोळ्यात भरते. डॅशबोर्डवरील फिनिशिंग अत्यंत आकर्षक आहे. गाडीचा व्हील बेस जास्त असल्यामुळे दोन सीटमधील अंतर वाढले आहे. एकूणच कारमध्ये बसल्यावर सिडान कारमध्ये बसल्याचा फील येतो. (वा. प्र.)