शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

राज्यातील पहिल्या ‘एनएफएसयू’चे गृहमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; ट्रान्झिट कॅम्पसचेसुद्धा ई-अनावरण

By योगेश पांडे | Updated: May 26, 2025 20:21 IST

वेदमंत्रांच्या उच्चारात भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. अमित शाह व इतर मान्यवरांच्या हस्ते विटा रचून पायाभरणी करण्यात आली. त्यानंतर ट्रान्झिट कॅम्पसचे ई-अनावरण झाले. गृहमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपणदेखील करण्यात आले.

योगेश पांडे - नागपूरनागपूर : राज्यातील पहिल्या ‘एनएफएसयू’च्या (नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी) कायमस्वरूपी कॅम्पसचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी तात्पुरत्या कॅम्पसचेदेखील ई-अनावरणदेखील झाले. सोमवारी कामठी तालुक्यातील चिचोली येथे हा कार्यक्रम झाला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. आशीष देशमुख, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, ‘एनएफएसयू’चे कुलगुरू डॉ. जे. एम. व्यास प्रामुख्याने उपस्थित होते. एनसीआयचा कार्यक्रम झाल्यावर गृहमंत्री शाह यांचे हेलिकॉप्टरने दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास चिचोली येथे आगमन झाले. वेदमंत्रांच्या उच्चारात भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. अमित शाह व इतर मान्यवरांच्या हस्ते विटा रचून पायाभरणी करण्यात आली. त्यानंतर ट्रान्झिट कॅम्पसचे ई-अनावरण झाले. गृहमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपणदेखील करण्यात आले.

‘एनएफएसयू’हे जगातील पहिले आणि एकमेव फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ आहे. नागपुरात ‘एनएफएसयू’चे अकरावे कॅम्पस राहणार आहे. गुजरात, नवी दिल्ली, गोवा, त्रिपुरा, मध्य प्रदेश, कर्नाटक, आसाम, मणिपूर, पुणे आणि परदेशात युगांडामध्ये येथे विद्यापीठ कार्यरत आहे. महाराष्ट्रात एनएफएसयूच्या नवीन कॅम्पसच्या स्थापनेमुळे कुशल फॉरेन्सिक तज्ज्ञ घडतील, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

गुन्ह्यांच्या वैज्ञानिक विश्लेषणाला मिळेल बळ

कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना फॉरेन्सिक सायन्सच्या वैज्ञानिक वापराद्वारे गुन्हे रोखण्यास, कमी करण्यास आणि शोधण्यास मदत मिळेल. तसेच विविध यंत्रणांची फॉरेन्सिक क्षमतादेखील वाढेल. नागपुरातील कॅम्पसमुळे कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित विविध समस्या सोडवण्यास मदत होईल. यामुळे न्यायदान प्रणालीला वेग मिळेल. एनएफएसयूमध्ये २०२५-२६ पासून फॉरेन्सिक व सायबर सुरक्षेशी संबंधित पाच अभ्यासक्रम सुरू होतील. त्यात एमएसस्सी (फॉरेन्सिक), एमएसस्सी (सायबर सिक्युरिटी), बीबीए, एमबीए या अभ्यासक्रमांचा प्रामुख्याने समावेश आहे.

टॅग्स :nagpurनागपूर