शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Municipal Election 2026 Voting Live Updates: मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला; मनसे उमेदवार यशवंत किल्लेदारांसमोर घडला प्रकार
2
कर्मचाऱ्यांना मिळणार ₹२ कोटींपर्यंतच्या इन्शुरन्स, स्वस्त लोनसह हे फायदे; लाँच झाली नवी सुविधा, जाणून घ्या
3
वनमंत्री गणेश नाईक यांची मतदान केंद्र शोधण्यासाठी धावपळ; व्यक्त केली तीव्र नाराजी
4
Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा अधिकार; कुणाला मतदान करायला हवं? हेही सांगितलं
5
"ज्या शाळेत मतदान केलं त्याबाहेरच ही अवस्था...", शशांक केतकरने दाखवली परिस्थिती, व्यक्त केला राग
6
731666404000 रुपये 'साफ'...! मुकेश अंबानी 100 अब्ज डॉलरच्या क्लब मधून बाहेर; आता Q3 वर नजर
7
मीरारोड येथील मतदान केंद्रात भाजपचे केंद्र प्रतिनिधी चक्क उमेदवारांच्या नावांचे कार्ड लाऊन बसले
8
गोंधळच गोंधळ...! नाशिकमध्ये मतदार याद्यांचा घोळ, मतदान यंत्रातही बिघाड, सुरुवातीला संथ गतीने मतदान 
9
"आजचाच दिवस जेव्हा रिमोट कंट्रोल...", मतदान केल्यानंतर अक्षय कुमारने दिली प्रतिक्रिया
10
अबू धाबीमध्ये भारताच्या सरकारी तेल कंपन्यांना सापडला खजिना; 'इंडियन ऑईल', 'बीपीसीएल'ला सापडले तेलाचे नवीन साठे
11
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
12
मस्क यांच्यावर डॉलर्सचा पाऊस, एकाच दिवसात संपत्तीत ४२.२ अब्ज डॉलर्सची वाढ
13
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
14
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
15
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
16
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
17
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
18
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
19
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
20
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्री अनिल देशमुख काँग्रेसवर नाराज, आघाडीचा धर्म पाळला नसल्याची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 05:19 IST

काँग्रेसने आघाडी धर्म पाळला नाही, अशी खंत व्यक्त करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषेदत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली.

नागपूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुका काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी करून लढले. काँग्रेस बहुमतात आल्यामुळे आम्ही अध्यक्षपद काँग्रेससाठी सोडले. पण आघाडी धर्म म्हणून राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद देणे अपेक्षित होते. मात्र काँग्रेसने आघाडी धर्म पाळला नाही, अशी खंत व्यक्त करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषेदत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी झाली. यात दोन्ही पदे काँग्रेसने आपल्याकडेच ठेवली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचे स्वर उमटू लागले आहेत. देशमुख म्हणाले की, निवडणूकपूर्व आघाडी झालेली असल्याने काँग्रेसकडे अध्यक्षपद तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपाध्यक्ष येणे अपेक्षित होते. मात्र काँग्रेसने तसे न करता ही दोन्ही महत्त्वाची पदे काँग्रेसने स्वत:च ठेवली. नागपूर जिल्हा परिषदेचे परिणाम हे केवळ नागपूरपुरतेच मर्यादित नाहीत. हे परिणाम दिल्लीपर्यंत जाऊ शकतात, असे संकेतही त्यांनी दिले.ते म्हणाले की, दोन्ही पक्षांनी ही निवडणूक सोबत लढविली. जागा वाटपसुद्धा ठरवूनच केले होते. त्यामुळे काँग्रेसने सत्तेत योग्य तो वाटा देणे अपेक्षित होते, तसे झाले नाही. सत्ता स्थापनेबाबत काही महत्त्वपूर्ण बैठका झाल्या, यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, मी स्वत: उपस्थित होते.काँग्रेसतर्फे निरीक्षक माणिकराव ठाकरे, मंत्री सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, नाना गावंडे यांनी चर्चा केली. पटेल यांनी काँग्रेसपुढे दोन प्रस्ताव ठेवले. यात पहिल्या प्रस्तावानुसार राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद आणि एक सभापतीपद मिळणे अपेक्षित होते.‘राष्ट्रवादीला योग्य वाटा देईल’दुसऱ्या प्रस्तावानुसार सभापतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे एक खुले आणि एक महिला अशी दोन सभापती पदांची मागणी करण्यात आली. मात्र काँग्रेसने पहिला प्रस्ताव अमान्य केला. राष्ट्रवादीतर्फे चंद्रशेखर कोल्हे आणि दिनेश बंग यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज सादर केले होते. मात्र त्यानंतर झालेल्या चर्चेतून आम्ही दोन्ही अर्ज मागे घेतले. आता सभापतींच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला योग्य तो वाटा देईल, अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस