शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

तिकिटासाठी होर्डिंगबाजी महागात पडणार ! एफआयआर नोंद झाल्यास उमेदवारी दाखल करताना येते अडचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:50 IST

Nagpur : आरक्षण जाहीर होताच महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी सर्व पक्षांतील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. नेते, आमदार आणि शुभेच्छुकांच्या छायाचित्रांनी सजलेल्या अवैध होर्डिंग्जची शहरात भरमार सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: आरक्षण जाहीर होताच महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी सर्व पक्षांतील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. नेते, आमदार आणि शुभेच्छुकांच्या छायाचित्रांनी सजलेल्या अवैध होर्डिंग्जची शहरात भरमार सुरू झाली आहे. मात्र, फक्त होर्डिंगबाजीच्या जोरावर तिकीट पक्के करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना महागात पडू शकते.

मनपा प्रशासनाने अवैध होर्डिंग्जविरुद्ध कारवाईसाठी झोनस्तरीय पथके तयार केली आहेत. इतकेच नव्हे तर उमेदवारी अर्ज दाखल करताना 'नो ड्यूज सर्टिफिकेट' घेताना होर्डिंग्ज संदर्भातील कारवाईची माहितीही तपासली जाणार आहे. कोणावर दंड ठोठावला असेल, तर दंडाची रक्कम भरावी लागेल. तसेच, कोणत्याही इच्छुकाच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यास अशा उमेदवारांच्या अडचणी वाढू शकतात. मनपा उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांनी सांगितले की, अवैध होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी झोननिहाय पथके तयार केलेली आहेत. मनपा निवडणुकीच्या काळात अवैध होर्डिंग्जचा पूर येतो. त्यामुळे यंदा कडक कारवाईची तयारी करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीवर दंड ठोठावल्यानंतरही तो वारंवार होर्डिंग्ज लावत असेल, तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. गुन्हा नोंद झाल्यास उमेदवारी दाखल करताना अडचण निर्माण होऊ शकते.

रात्रीच्या वेळी लावले जातात होर्डिंग्ज 

एखाद्या नेत्याचा वाढदिवस किंवा आगमन असल्यास रात्रीच्या वेळी चौकात अवैधपणे होर्डिंग्ज लावले जातात. अनेकदा ती सिग्नललाच झाकून टाकतात. मध्य नागपुरात काही नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी रस्त्याच्या कडेला कटआउट उभे केले जातात.त्यांना हटविण्याची कारवाई सुरू होताच होडिंगबाज आमदारांचा धाक दाखवतात. उत्तर आणि दक्षिण नागपुरातील रिंगरोडवरही ठिकठिकाणी अवैध होडिंग्ज दिसतात.

चौक, फुटपाथ झाले विद्रूप

गणेशोत्सव, जन्माष्टमी, दिवाळीनंतर आता नववर्षाच्या शुभेच्छांचे होर्डिंग्ज लावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीचर नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गल्ल्या, मोहल्ले, चौक, फुटपाथ याबर अवैध पद्धतीने होर्डिंग्ज लायली जात आहेत. सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर सर्वत्र ती दिसतात. आतील वस्त्यांवरही या होर्डिंग्जची भरमार आहे. मनपाने यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Illegal Hoarding for Tickets Could Be Costly: FIR Hinders Nomination

Web Summary : Nagpur civic body warns aspirants: illegal hoardings for election tickets could backfire. FIRs will create hurdles during nomination. The municipality has formed teams to take action against these hoardings, and repeat offenders will face police complaints. Citizens demand strict action.
टॅग्स :nagpurनागपूरLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकNagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणुक 2022