नागपुरात दारुच्या नशेत सख्ख्या भावावरच हातोडीने प्राणघातक वार
By योगेश पांडे | Updated: March 11, 2024 15:43 IST2024-03-11T15:43:07+5:302024-03-11T15:43:27+5:30
मंगेश सरवन कनोजे (२५, पवनपुत्र नगर) असे आरोपीचे नाव आहे तर आकाश सरवन कनोजे (२०) हा जखमी त्याचा लहान भाऊ आहे.

नागपुरात दारुच्या नशेत सख्ख्या भावावरच हातोडीने प्राणघातक वार
नागपूर : दारूच्या नशेत जमिनीवर झोपलेल्या सख्ख्या भावावरच हातोडीने प्राणघातक वार करण्यात आले. या घटनेत लहान भाऊ गंभीर जखमी झाला आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मंगेश सरवन कनोजे (२५, पवनपुत्र नगर) असे आरोपीचे नाव आहे तर आकाश सरवन कनोजे (२०) हा जखमी त्याचा लहान भाऊ आहे. दोन्ही भावांना दारूचे व्यसन आहे. १० मार्च रोजी आकाश हा रात्री आठ वाजता कामावरून घरी परत आला. दारूच्या नशेत जेवण न करता तो जमिनीवरच झोपी गेला. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता मंगेश दारू पिऊन घरी आला व पलंगावर झोपला. रात्री अकरा वाजतानंतर तो दारूच्या नशेत उठला व पलंगाखाली असलेली लोखंडी हातोडी घेऊन आकाशच्या डोक्यावर तीन वेळा वार केला. यात आकाश गंभीर जखमी झाला. आवाज ऐकून त्यांची आई ललिता उठली. तिने आकाशला तातडीने मेडिकल इस्पितळात नेले. ललिताच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात मंगेशविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.