शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
4
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
5
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
6
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
7
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
8
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
9
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
10
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
11
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
12
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
13
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
14
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
15
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
16
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
17
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
18
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
19
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
20
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
Daily Top 2Weekly Top 5

इतिहास क्रांतिकारकांच्या रक्ताने लिहिला जातो!

By admin | Updated: May 26, 2014 01:03 IST

क्रांती म्हणजे, प्रस्थापित रूढी, परंपरा व वाईट गोष्टींना छेद देऊन समाज व देश हितासाठी पुढे आलेला एक विचार असतो. कोणत्याही राष्ट्राचा इतिहास हा शाईने नव्हे, तर क्रांतिकारकांच्या रक्तान

नागपूर :  असे प्रतिपादन अभिनव भारत संघटनेच्या अध्यक्षा हिमानी सावरकर यांनी केले. संवेदना परिवार संस्थेच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी व्याख्यान व संवेदना गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. महाल येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश गुप्ता होते. अतिथी म्हणून निखील गडकरी उपस्थित होते.

हिमानी सावरकर पुढे म्हणाल्या, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विज्ञाननिष्ठ व समाज हितकारक दृष्टिकोन होता. त्यांनी सर्वप्रथम वैचारिक क्रांती केली. त्यांनी समाजाला विचार दिला. शिवाय लिखाणातूनही क्रांती कशी घडू शकते, हे सावरकरांनी दाखवून दिले. या क्रांतिकारकांनी ब्रिटिश सम्राज्याला हादरून सोडले होते. तसेच लोकांमध्ये राष्ट्रीय अस्मियता जागविण्याचे त्यांनी काम केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आत्मसात केले होते, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. रामटेके यांना संवेदना गौरव पुरस्कार

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून संवेदना गौरव पुरस्कार सोहळाही यावेळी आयोजित करण्यात आला होता. या भरगच्च कार्यक्रमात हिमानी सावरकर यांच्या हस्ते शशिकांत रामटेके यांना संवेदना गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.(प्रतिनिधी)