शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

नागपूरचा ऐतिहासिक वारसा : ऐतिहासिकतेची साक्ष पटविणारे कस्तूरचंद पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:24 PM

उपराजधानीच्या अभिमानाचा वारसा सांगणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये ‘कस्तूरचंद पार्क’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. शतकाहून अधिक वर्षांचा इतिहास अंगाखांद्यावर खेळविणारे हे मैदान म्हणजे दिवाणबहादूर सर कस्तूरचंद डागा यांनी शहराला दिलेली अमूल्य भेट होय. ब्रिटिश काळात होणारे सैन्याचे आणि आता पोलीस जवानांचे पथसंचलन, गणराज्य दिनाची परेड अशा गोष्टी, विविध खेळांच्या स्पर्धा असा इतिहास या मैदानावर घडला आहे.

ठळक मुद्देसर डागा यांची शहराला भेट : ब्रिटिशकाळापासून होते पथसंचलन, अनेक स्पर्धांनी गाजले मैदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीच्या अभिमानाचा वारसा सांगणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये ‘कस्तूरचंद पार्क’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. शतकाहून अधिक वर्षांचा इतिहास अंगाखांद्यावर खेळविणारे हे मैदान म्हणजे दिवाणबहादूर सर कस्तूरचंद डागा यांनी शहराला दिलेली अमूल्य भेट होय. ब्रिटिश काळात होणारे सैन्याचे आणि आता पोलीस जवानांचे पथसंचलन, गणराज्य दिनाची परेड अशा गोष्टी, विविध खेळांच्या स्पर्धा असा इतिहास या मैदानावर घडला आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर रेल्वे स्टेशनपासून अवघ्या एक कि.मी.च्या अंतरावर व ११८ बटालियन कॅम्पच्या समोर १२ एकरामध्ये हे विस्तीर्ण मैदान पसरलेले आहे. एकोणिसाव्या शतकात राजस्थानच्या बिकानेरहून आलेले उद्योगपती कस्तूरचंद डागा यांनी नागपूर शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शहर आणि शहराच्या आसपास वस्त्रोद्योग, कोळशाची खाण अशा अनेक उद्योगांचा पाया त्यांनी रोवला. विशेष म्हणजे त्यांच्या उद्योगाचा विस्तार नागपूर ते रंगून आणि कराची ते ढाकापर्यंत पसरला होता. उद्योगपती असण्यासह दानशूर व्यक्ती म्हणूनही ते ख्यातनाम होते. त्यांचे सामाजिक कार्य पाहून ब्रिटिश सरकारने त्यांना सर आणि दिवाणबहादूर अशा उपाधी बहाल केल्या होत्या. त्यांनीच सीताबर्डी किल्ल्यासमोर असलेली ही मोकळी जागा शहरासाठी दान केली. त्रिकोणी आकारात असलेल्या या मैदानाच्या मध्यभागी राजस्थानी शैलीतील आकर्षक घुमट असलेला चबुतरा तयार करण्यात आला आहे. ब्रिटिश काळात सीताबर्डी किल्ल्यातील सैन्याच्या तुकड्या या मैदानावर पथसंचलन करायच्या आणि वरिष्ठ अधिकारी या चबुतºयावर बसून पथसंचलनाची देखरेख करायचे. शिस्तबद्ध घोड्यांचेही संचलन येथे होत असे. हे पथसंचलन बघायला शहरातील लोकांची गर्दी होत असल्याची माहिती जाणकार सांगतात. त्यावेळी मैदानाच्या सर्व बाजूला उंच वृक्ष होते. १९१७ साली सर डागा यांच्या निधनानंतर मैदानाच्या एका बाजूला त्यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता. सर डागा यांनी पाकिस्तानच्या रावळपिंडी येथेही अशीच जागा दान केली होती व त्या मैदानाचे नावही कस्तूरचंद पार्क असेच ठेवण्यात आले आहे.पूर्वी या मैदानावर फुटबॉल, सायकल पोलो, धनुर्विद्या, दौड आदी स्पर्धा घेतल्या जायच्या. या स्पर्धांमधून अनेक राज्य व राष्ट्रीय स्तराचे खेळाडू घडले आहेत. २००६ साली सायकल पोलो स्पर्धा घेण्यात आली होती. पुढे प्रदर्शन, संगीत कार्यक्रम आदींसारख्या व्यावसायिक उपयोगामुळे मैदान खराब होऊ लागल्याने या स्पर्धा बंद होत गेल्या.२०१० साली तर निर्धारित असलेली सायकल पोलो स्पर्धा रद्द करण्यात आली होती. पुढे मात्र ऐतिहासिक वारसा म्हणून मान्यता मिळाल्यानंतर व्यावसायिक कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली. त्यानंतर २०१७-१८ मध्ये महापौर चषकांतर्गत पुन्हा सायकल पोलोचे आयोजन करण्यात आले होते.विस्तीर्ण मैदान असल्याने आजही या मैदानावर एका बाजूला मुले क्रिकेट व इतर खेळांचा आनंद घेताना दिसतात. सकाळी नागरिकांचे फिरणे, योगासने व व्यायाम करताना लोक दृष्टीस पडतात. कधी कधी पोलिसांची परेडही येथे होते. दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी होणारा रावण दहन हा महत्त्वाचा सोहळा या मैदानावरच घेतला जातो. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभांसाठीही या मैदानालाच पसंती दिली जाते. अशा या ऐतिहासिक मैदानावर लोकमतच्या पुढाकाराने गगनचुंबी राष्ट्रध्वज उभारण्यात येणार असून, मैदानाच्या नूतनीकरणासाठी वेगवेगळे प्रकल्प राबविले जाणार आहेत.

 

टॅग्स :Kasturchand Parkकस्तूरचंद पार्कnagpurनागपूर