लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: उपराजधानीतील कुख्यात हिरणवार टोळीने स्वतःचा बदला घेण्याच्या नादात नागपुरात दंगली घडविण्याचा कट रचला होता. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एका रॅलीत फायरिंग करून नागपुरात इतर ठिकाणी हिंसाचार पसरविण्याचे त्यांचे षडयंत्र होते. धरमपेठेतील सोशा कॅफेचे मालक अविनाश भूसारी यांच्या हत्येनंतर परत चर्चेत आलेल्या हिरणतार टोळीला बेडचा ठोकल्यानंतर चौकशीतून धक्कादायक बाब समोर आली आहे.
हिरणवार टोळीच्या टार्गेटवर शेखू गँगचा सदस्य प्रवेश गुप्ता हा होता. प्रवेश गुप्ता १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पांढराबोडीत रॅलीचे आयोजन करतो याची त्यांना कल्पना होती. त्या रॅलीत फायरिंग करून प्रवेशचा गेम करण्याचे त्यांनी ठरविले होते. अर या रॅलीला रक्तरंजित गालबोट लागले असते तर त्याचे पडसाद इतर ठिकाणीदेखील उमटले असते व विविध ठिकाणी दंगली घडविण्याचा त्यांचा मानस होता. नागपुरात मार्च महिन्यात हिंसाचार झाला होता व त्यांना याच्या दहशतीची पूर्ण कल्पना होती. असे झाले असते तर हिरणतार टोळीची दहशत आणखी वाढली असती, हाच यामागचा त्यांचा विचार होता. मात्र त्या दिवशी त्यांचा तो कट शिजू शकला नाही. गुप्ता हाती न लागल्यामुळे अखेर त्यांनी पवन हिरणवार हत्याकांडातील आरोपी अवी भुसारीचा भाऊ अविनाश भुसारीची हत्या करण्याचे वेळेवर ठरविले.
काहीही करून बदला घ्यायचा, हेच हिरणवार टोळीच्या डोक्यात होते. त्यामुळे कुठल्याच प्रकरणात काहीही सहभाग नसताना व काहीच घेणेदेणे नसताना त्यांनी केवळ एका आरोपीचा भाऊ म्हणून अविनाश भुसारी यांची भर रस्त्यात हत्या केली. पोलिसांच्या हाती अद्याप एकही पिस्तूल नाही हिरणवार टोळीला महालातील शाहिद अख्तर नावाच्या ऑटोचालकाने तीन पिस्तुले मिळवून दिली होती. १.२७ लाखांत त्याने हे पिस्तूल त्यांना मिळवून दिले होते. काहीही करून प्रवेश गुप्ताला मारायचे व दहशत निर्माण करायची हाच हिरणवार टोळीचा कट होता. त्यांनी २० काडतुसेदेखील मिळविली होती. शाहिदने मध्य प्रदेशातील रिवा येथील गुन्हेगारांकडून ती पिस्तुले मिळविली होती. आरोपींनी एका पिस्तुलातून अविनाश भुसारी यांची हत्या केली व सहा गोळ्या झाडल्या होत्या. काही बुलेट पिस्तुल तपासणीत वापरल्या. मात्र हिरणवार टोळीतील फरार असलेल्या आरोपींकडे अद्यापही दोन पिस्तुले असून त्यांच्याकडे ९ जिवंत काडतुसे आहेत. तसेच तिसरे पिस्तूलदेखील आरोपींनी लपविले असून, तेदेखील पोलिसांना जप्त करता आलेले नाही,
पिस्तुलासाठी आजीचेच चोरले पैसेबंटी हिरणवारला १.२७ लाखांत पिस्तूल मिळणार होते. मात्र त्याच्याकडे पैसे नव्हते. शिबू यादव हा बंटीच्या आत्याचा मुलगा आहे. त्याने शिबूला पैसे जमवायला सांगितले. शिबूने त्याच्या आजीचे पैसे चोरून ते बंटीला दिले होते.